महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी नगर जिल्हा संघाची २ डिसेंबरला निवड

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी नगर जिल्हा संघाची २ डिसेंबरला निवड

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने होणार्‍या ६२ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गादी-माती अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब लढत २०१८ कुस्ती स्पर्धेसाठी राहता तालुक्यातील चितळी अहमदनगर जिल्हा तालिम संघाची कुस्ती निवड चाचणी स्पर्धा रविवारी २ डिसेंबर रोजी होणार आहे. या निवड चाचणीसाठी सर्व तालुकास्तरीय विजयी संघांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे, निवड चाचणीचे आयोजक तथा राहता तालिम संघाचे अध्यक्ष पै.रविंद्र वाघ आणि जिल्हा तालिम संघाचे उपाध्यक्ष पै.रविंद्र वाघ यांनी केले आहे.

हेही वाचा – महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीस मल्लांचा मोठा प्रतिसाद

विजयी मल्लांना मिळणार संधी

या राज्यस्तरीय वरिष्ठ गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२ व ९७ किलो वजनगट आणि महाराष्ट्र केसरी गटासाठी निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील विजयी मल्ल जालना येथे होणार्‍या ६२ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गादी-माती अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब लढत कुस्ती स्पर्धेसाठी निवडले जाणार आहेत.अधिक माहितीसाठी पै.रविंद्र वाघ ९९२२७९८९९४,पै.वैभव लांडगे ९८२२१३५०३५,पै.नाना डोंगरे ९२२६७३५३४६ यांच्याशी संपर्क साधवा,असे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा – कुस्तीही आता घराघरात पोहोचणार!

First Published on: November 28, 2018 5:18 PM
Exit mobile version