घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीस मल्लांचा मोठा प्रतिसाद

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीस मल्लांचा मोठा प्रतिसाद

Subscribe

कुस्ती खेळामध्ये अनेक संधी निर्माण झाल्या असून युवकांनी खेळाकडे करिअर म्हणून पहावे. त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यास प्रोत्साहित करण्याचे आवाहन पै.नाना डोंगरे यांनी केले आहे.

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने होणार्‍या ६२ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गादी-माती अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब लढत आणि ४१ वी कुमार (सब-ज्युनिअर), २३ वी ग्रीकोरोमन राज्य अजिंक्यपद २०१८ या कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या कुस्ती स्पर्धेसाठी अहमदनगर तालुक्यातील मल्लांची निमगाव वाघा येथे निवड चाचणी घेण्यात आली. २२५ मल्ल सहभागी झालेल्या या निवड चाचणीत कुस्त्यांचा थरार रंगला होता. डफाचा निनादात मल्लांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत एकापेक्षा एक सरस डावांनी कुस्ती शौकिनांची मने जिंकली.

युवकांनी खेळाकडे करिअर म्हणून पहावे

अहमदनगर तालुका तालिम सेवा संघाच्यावतीने या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी जि.प. सदस्य माधवराव लामखडे यांच्या हस्ते आखाड्याचे पूजनाने कुस्ती लावून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. प्रास्ताविकात पै.नाना डोंगरे यांनी खेळामध्ये अनेक संधी निर्माण झाल्या असून युवकांनी खेळाकडे करिअर म्हणून पहावे. त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यास प्रोत्साहित करण्याचे आवाहन करुन, स्पर्धेची माहिती दिली.

- Advertisement -

कुस्तीचा सामना पहायला गर्दी

माधवराव लामखडे म्हणाले की, खेळाद्वारे युवक सदृढ होवून राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरित होणार आहे. आवड असलेल्या खेळात स्वत:ला झोकल्यास त्यामध्ये यश निश्‍चित मिळते. सदृढ राष्ट्र निर्माणासाठी युवकांनी मैदानी खेळाकडे वळण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गावाच्या बिरोबा मंदिराच्या प्रांगणात रंगलेल्या कुस्तीचा थरार पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. या स्पर्धेसाठी पंच म्हणून पै.गणेश जाधव, पै.समिर पटेल यांनी काम पाहिले. यामधील विजेत्या मल्लांना वरील कुस्ती स्पर्धेच्या जिल्हा स्तरीय निवड चाचणीकरिता पाठविण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -