अजित पवार यांच्या पुण्यासाठी ५ मोठ्या घोषणा, जाणून घ्या

अजित पवार यांच्या पुण्यासाठी ५ मोठ्या घोषणा, जाणून घ्या

पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला आहे. या अर्थसंकल्पात समाजातील सर्वच घटकांचा विचार करण्यात आला आहे. राज्याच्या विकासावर आणि अर्थव्यवस्थे भर पाडण्यासाठी अनेक नव्या योजना आणि प्रकल्पांची घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पात जुन्या आणि नव्या योजनांवर तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील सर्वच जिल्हांमध्ये अनेक योजना राबविण्यात येत आहेत. तसेच पुण्यातही मोठे प्रकल्प आणि योजनांची घोषणा केली आहे. पुण्याच चक्राकार रिंगरोड, मुंबई-पुणे महामार्गवरही निधीची तरतूद करण्यात आली आहे. पुण्यातील आरोग्य विभागातही मोठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच पुण्यात आणखी एक विमानतळ उभारण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. कोरोनामुळे स्थुल राज्य उत्पन्नात ८ टक्के घट होऊनही कृषी, पायाभूत सुविधांची कामे तसेच उद्योग व गुंतवणुकीला अधिक चालना देऊन महाराष्ट्र मोठी भरारी घेईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

पुण्यासाठी अर्थसंकल्पात या मोठ्या घोषणा

पुणे चक्राकार मार्ग – राज्यातील कोकण, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातून मोट्या प्रमाणात प्रवासी व मालवाहतूक पुणे शहरातून होत असते. त्यामुळे पुण्यातील वाहतूकीवर प्रचंड ताण पडतो आणि पुण्यात वाहतूक कोंडी निर्माण होते. पुण्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि इंधनाची बचत व्हावी यासाठी पुण्याबाहेरून चक्राकार मार्गाची म्हणजेच रिंग रोड उभारणी ही काळची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सुमारे १७० किलोमीटर लांबीच्या २६ हजार कोटी रुपये अंदाजित किंमतीच्या आठ, पदरी चक्राकार मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच राज्यातील वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येवर मात करता येणार आहे.

पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प – पुणे-नाशिक या मध्यम अतिजलद रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यासाठी महाविकास आघाडी शासनाने मान्यता दिली आहे. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाची प्रस्तावित लांबी २३५ किलोमीटर असून मार्गावर पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात एकूण २४ स्थानिके प्रस्तावित आहेत. या मध्यम अतिजलद रेल्वेची गती २०० किलोमीटर प्रतितास एवढी असणार आहे. १६ हजार ३९ कोटी खर्च प्रकल्पासाठी अपेक्षित आहे.

पुणे येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यास शासनाने प्रशासकीय वित्तीय मान्यता दिली आहे. या कामाचा तांत्रिक व आर्थिक सुसाध्यता अहवाल तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे अर्थंमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

पुण्यात बालेवाडी येथे क्रीडा संकुल सुरु करण्यात आले आहे. या क्रीडा संकुलात विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध केल्या असल्यची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयासाठी २८ कोटी २२ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ससून रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी हा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

 

First Published on: March 8, 2021 5:57 PM
Exit mobile version