बेस्टमधील कंत्राटी कर्मचारी आजही संपावर, विविध आगारात कामबंद आंदोलन

बेस्टमधील कंत्राटी कर्मचारी आजही संपावर, विविध आगारात कामबंद आंदोलन

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई – बोनस आणि वाढीव पगारासाठी बेस्टच्या सांताक्रुजच्या डेपोमधील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. त्यामुळे ऐन कामाच्या वेळी मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. तर, आता दुसरीकडे जोगेश्वरीतील मजास आगारातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन छेडले आहे. समान काम, समान दान, बोनस आणि विविध मागणींसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.

हेही वाचा सरकारी वाहतूक कर्मचाऱ्यांचा संप, चार वर्षांत तीन वेळा सर्वसामान्यांना फटका

जोगेश्वरीतील मजास बस आगारातील कंत्राटी शेकडो कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासूनच कामबंद आंदोलन पुकारले आहे. कर्मचाऱ्यांना नियुक्त करताना कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रेदेखील दिले नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतोय. तसंच, पगार, बोनस आणि समान काम समान मोबदला आदी मागण्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतोय. तर, आंदोलनाचे हे लोण प्रतीक्षा नगर आणि धारावी आगारातही पोहोचले आहे. येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांनीही कामबंद आंदोलन पुकारले आहे. दिवाळीसाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना आज मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

बेस्टमधील कंत्राटी कर्मचारी गेल्या महिन्याभरापासून प्रशासनाविरोधात आंदोलन पुकारत आहेत. यामुळे बेस्टची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कालही सांताक्रुज आगारातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यामुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला होता.

First Published on: October 23, 2022 9:20 AM
Exit mobile version