फटाके कधी फोडायचे हे पण कोर्ट सांगतं? राज ठाकरेंची टीका म्हणाले, आम्हाला हात-पाय…

फटाके कधी फोडायचे हे पण कोर्ट सांगतं? राज ठाकरेंची टीका म्हणाले, आम्हाला हात-पाय…

ठाणे: राज ठाकरे यांनी कोर्टाच्या निर्णयावर बोट ठेवलं आहे. राज ठाकरे ठाणे दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कोर्ट देत असलेल्या निर्णयांवर टीका केली. सण कसे साजरे करायचे? फटाके कधी फोडायचे हेही कोर्ट ठरवत, असं म्हणत राज यांनी निशाणा साधला. (The court also tells when to break the firecrackers Raj Thackeray s criticism said we need hands and feet)

राज ठाकरेंना सिनेट निवडणुकांवरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचा वाद सध्या कोर्टात आहे. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कोर्ट हल्ली चित्रविचित्र निर्णय देतं. म्हणजे फटाके कधी फोडायचे? सण कसे साजरे करायचे, हे पण कोर्ट ठरवतं. असं असलं तरीही कोर्टाने जे आदेश दिले आहेत त्यांचं पालन होतं का? हे पाहायला मात्र कोर्ट येत नाही, असं खोचक वक्तव्य राज यांनी यावेळी केलं.

आम्हालाच हातपाय हलवावे लागतील- राज ठाकरे

राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी पाट्या झाल्या पाहिजेत, यासाठी जी आमची आंदोलंन झाली. ज्या आंदोलनानंतर तुम्हाला अनेक शहरांमध्ये मराठी पाट्या दिसायला लागल्या. परंतु मराठी भाषेत पाट्या लावणार नाही, असं म्हणत इथले व्यापारी कोर्टात गेले. मला याचं आश्चर्य वाटतं. म्हणजे महाराष्ट्राच्या भाषेच्या विरोधात महाराष्ट्रात राहणारे, महाराष्ट्र ज्यांना पोसतो,  ज्या मराठी लोकांच्या जीवावर हे व्यापार करतात ते लोक कोर्टात जातात. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे याबाबतीत आभार मानायला हवे, त्यांनी त्या त्या राज्यात त्या त्या भाषेचा आदर राखला गेला पाहिजे, असा निर्णय दिला. परंतु असं असूनही सरकारकडून न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं योग्य पालन होताना दिसत नाही, यासाठी आता पुन्हा आम्हालाच हातपाय हलवावे लागतील, असं म्हणत ठाकरेंनी सरकारला इशारा दिला आहे.

याआधीही जेव्हा कोर्टाने दहिहंडीमध्ये थरांवर मर्यादा आणली होती. त्यावेळीही राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. कोर्टाने दहिहंडीत लावल्या जाणाऱ्या थरांवर आक्षेप घेतला होता, तसंच थरांची मर्यादा ठरवून दिली होती. यावर राज ठाकरे यांनी दहीहंडी आता खुर्चीवर चढून हांडी फोडायची का? असा सवाल केला होता.

(हेही वाचा: ठाकरे बंधूंचा एक सूर; रामलल्ला दर्शनावरून राज यांनी घेतलं भाजपला फैलावर )

First Published on: November 16, 2023 2:49 PM
Exit mobile version