घरthaneठाकरे बंधूंचा एक सूर; रामलल्ला दर्शनावरून राज यांनी घेतलं भाजपला फैलावर

ठाकरे बंधूंचा एक सूर; रामलल्ला दर्शनावरून राज यांनी घेतलं भाजपला फैलावर

Subscribe

अमित शहा यांनी रामलल्लाच्या दर्शनाबाबत दिलेल्या आश्वासनाचा राज ठाकरेंनी समाचार घेतला. त्यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे. राज ठाकरे म्हणाले की, थोड्याच दिवसांत भाजप टूर्स अँण्ड ट्रॅव्हल्सचं नवं खातं उघडेल.

ठाणे:केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशच्या निवडणुकीत मतदारांना अयोध्येतील रामलल्लाचं मोफत दर्शन देण्याचं आश्वासन दिलं आहे. शहा यांच्या या आश्वासनाला ठाकरे बंधूंनी मात्र फैलावर घेतलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की, निवडणुकीत धार्मिक गोष्टींचं आश्वासन देता येतं काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आता यावर राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने आता टूर्स अँण्ड ट्रॅव्हल्स नावाचं नवं खात उघडलं असं वाटतं, असं म्हणत टीकास्त्र डागलं. (A tune by the Thackeray brothers Raj Thackeray and Uddhav Thackeray took the BJP on a target on Ramlalla darshan)

नेमंक काय म्हणाले राज ठाकरे?

अमित शहा यांनी रामलल्लाच्या दर्शनाबाबत दिलेल्या आश्वासनाचा राज ठाकरेंनी समाचार घेतला. त्यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे. राज ठाकरे म्हणाले की, थोड्याच दिवसांत भाजप टूर्स अँण्ड ट्रॅव्हल्सचं नवं खातं उघडेल. रामलल्लाच्या दर्शनावरून काय मत मागता, मत तुम्ही केलेल्या कामावर मागा. रामलल्लाच्या दर्शनाचं आमिष का दाखवता? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थि केला. तसंच, इतकी वर्ष तुमची सत्ता आहे. त्यात तुम्ही काय काय काम केली हे लोकांसमोर येणं गरजेचं असल्याचंही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं.

- Advertisement -

वर्ल्ड कप पण जिंकवतील

निवडणूक आयोग लोकांना दिल्या जाणाऱ्या अवाजवी आश्वासनांवर आधी हरकत घेत होतं. मात्र आता तसं होताना दिसत नाही. यावर तुमचं काय मत आहे, असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, मला तर वाटतं की वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारतविरुद्ध जो संघ असेल त्याला सांगितलं जाईल की, सहाबने बोला है. असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसंच,  वर्ल्ड कप जिंकवून देणं हा लोकसभा 2024 च्या निवडणूकीचा भाग तर नाही ना, असं विचारला असता राज ठाकरे म्हणाले की,  चंद्रावर गेलेलं यानही लोक विसरले आणि लोकसभा 2024 च्या निवडणुका अजून वेळ आहे. त्यामुळे वर्ल्डकपचा आणि त्याचा काही संबंध आहे, असं वाटत नाही.

(हेही वाचा: अद्वय हिरेंवरील कारवाई राजकीय दबावातून, संजय राऊतांचे सरकारवर गंभीर आरोप )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -