Mahad Building Collapse : दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर; बचावकार्य सुरूच

Mahad Building Collapse : दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर; बचावकार्य सुरूच

महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. ताहीर गार्डन ही पाच मजली इमारत २४ ऑगस्टला संध्याकाळच्या सुमारास कोसळली होती. मृतांमध्ये ७ पुरुष आणि ८ महिलांचा समावेश आहे. या दुर्घटनेला जवळपास ३६ तास उलटूनही बचाव पथकाकडून शोधकार्य सुरु आहे. यात ४१ कुटुंब राहत होते. दुर्घटनाग्रस्त ताहीर गार्डन या इमारतीचे विकासकासह पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्यासह पाच जणांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांच्या अटकेसाठी पोलिसांचे विशेष पथक ते राहत असलेल्या ठिकाणी रवाना झाले आहेत. सोमवारी संध्याकाळी महाड शहरांतील काजळपुरा परिसरातील ताहीर गार्डन ही इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि सार्‍या महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटले.

ढिगार्‍यातून काढण्यात आलेले मृतदेह

  1. सय्यद हमिद समीर,
  2. नविद झमाणे,
  3. नौसिन नदीम बांगी,
  4. अदी हसिन शेखनाग,
  5. रोशनबी देशमुख,
  6. फातीमा अन्सारी,
  7. इसतम हसिम शेखनाग,
  8. अल्ल तिमस बल्लारी,
  9. शौकत आदम अलसुलकर
  10. अब्दुल काझी
  11. हबीबा हजवाने
  12. अनोळखी महिला

मदत आणि पूनर्वसन मंत्री यांनी घटनास्थळी भेट दिली असून त्यांनी दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे लोकांचे जीव गेले आहेत. जे जबाबदार आहेत त्यांना कठोर शासन होईल. मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत केली जाईल. यामध्ये चार लाख रुपयांची मदत आणि पुनर्वसन खात्यातर्फे तर १ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून देण्यात देण्यात येतील. जखमींना ५० हजार रुपयांची दिले जाणार असून या घटनेत ज्यांनी आपले घर गमावले त्यांनाही आर्थिक मदत केली जाईल, असे आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

हेह वाचा –

Redmi Note 9 Pro Max खरेदी करण्याची आज संधी; जाणून घ्या, ऑफर्स

First Published on: August 26, 2020 9:14 AM
Exit mobile version