घरटेक-वेकRedmi Note 9 Pro Max खरेदी करण्याची आज संधी; जाणून घ्या, ऑफर्स

Redmi Note 9 Pro Max खरेदी करण्याची आज संधी; जाणून घ्या, ऑफर्स

Subscribe

आज भारतात Redmi Note 9 Pro Max विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हा स्मार्टफोन मार्चमध्ये देशात लॉन्च करण्यात आला होता. 20 हजार रुपयांपेक्षा कमी असून हा एक लोकप्रिय स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस एक होल-पंच डिझाइन आणि 64 एमपी क्वाड कॅमेरा सेटअप आहे. Redmi Note 9 Pro Maxच्या 6 जीबी + 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे, 6 जीबी + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 18,499 रुपये आहे आणि 8 जीबी + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. ऑरोरा ब्लू, ग्लेशियर व्हाइट आणि इंटरस्टेलर ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकतील.

आज Amazon आणि Xiaomi च्या वेबसाइटवरून दुपारी 12 वाजल्यापासून त्याची विक्री होईल. हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एअरटेलकडून 298 आणि 398 रुपयांच्या दुप्पट डेटाचा लाभ मिळणार आहे. याव्यतिरिक्त, Mi True Wireless Earphones 2 वर ग्राहकांना 2,200 रुपयांची सूट देखील मिळणार आहे.

हे आहेत Redmi Note 9 Pro Max चे स्पेसिफिकेशन्स

  • फोटोग्राफीसाठी त्याच्या मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 64 MP चा आहे. याशिवाय येथे 8 MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, 5 MP मॅक्रो कॅमेरा आणि 2 MO डेप्थ कॅमेरा देखील उपलब्ध आहे. फ्रंट सेल्फीसाठी 32 MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.
  • हा स्मार्टफोन MIUI 11 वर आधारलेला असून 6.67 इंचाचा फुल-HD+ (1,080×2,400 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले आहे. यात 8GB LPDDR4X रॅमसह ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर आहे.
  • त्याची इंटरनल मेमरी 128GB पर्यंत आहे, जी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढविली जाऊ शकते. याची बॅटरी 5,020mAh असून 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. येथे फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -