बंटी-बबलीचे कारनामे; जप्त होणार्‍या घराच्या नावावर चौघांची फसवणूक

बंटी-बबलीचे कारनामे; जप्त होणार्‍या घराच्या नावावर चौघांची फसवणूक

नाशिक : शहरातू दोघा बंटी-बबलीने चौघांना एकच घर राहण्यासाठी देण्याचे आमिष देऊन लाखो रुपये लाटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुख्य म्हणजे हे बंटी-बबली पैसे घेऊन फरार झाले होते. मात्र, ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना विविध कारणे सांगून चालढकल करत होते. परंतु, अशात बँकेकडून या घरासाठी घेतलेले लोनचे हफ्ते न भरल्याने बिंग फुटण्याची वेळ येताच हे दाम्पत्य पसार झाले आणि फसवणूक झाल्याचे पैसे देणार्‍यांच्या लक्षात आले.

तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यप्रकाश गणूप्रसाद जयस्वाल आणि त्याची पत्नी पार्वती उर्फ गौरी सूर्यप्रकाश जयस्वाल हे दोघेही नवीन नाशिकमध्ये दत्ता चौक परिसरात घर क्रमांक एन ३१/एच२/०५/०७ येथे काही वर्षांपासून राहत होते. त्यांनी इटिऑस फायनान्स कंपनीकडून गृहकर्ज घेतले होते. याप्रकरणी त्यांनी कोणालाही न कळवता ओळखीतील लोकांकडून मला घराचे बांधकाम करायचे आहे. मला मदत करा. तुम्ही दुसरीकडे भाड्यानेच राहता तर घर बांधल्यानंतर ते घर मी तुम्हालाच राहावयास देईल, तुमचे दर महिन्याचे भाडे तीन ते चार हजार रुपये वाचेल आणि माझ्याही घराचे बांधकाम पूर्ण होईल. तुम्हाला जेव्हा पैशाची गरज पडेल तेव्हा मी तुमचे पैसे परत करीन, असे सांगून विश्वास संपादित केला. मुख्य म्हणजे कोर्टाच्या स्टॅम्पवर लिहून देतो, असे सांगून प्रत्येकाला नोटरी वकिलांमार्फत बॉण्ड करून दिले.

चारही व्यक्ती एकमेकांना ओळखत नव्हते, त्यामुळे जयस्वाल दाम्पत्य फसवणूक करत असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. परंतु, जनार्दन गायकवाड यांनी मला राहावयास घर द्या, असा तगादा लावला. शिवाय, फायनान्स कंपनीने हप्त थकल्याने वसुलीसाठी तगदा लावला असता आता आपले बिंग उघडे पडेल, हे लक्षात येताच कोणालाही न सांगता जयस्वाल दाम्पत्य नाशिकमधून पसार झाले. त्यांना इतर व्यक्तींनी फोन करून विचारले असता आम्ही बाहेरगावी कामासाठी आलो आहोत. आम्ही आठ ते दहा दिवसांत परत येऊ, असे सांगून वेळ मारून नेली गेली. काही दिवसानंतर कॉल केले असता आमच्या घरात नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आम्ही महिनाभर इकडे थांबणार आहोत. आल्यानंतर तुम्हाला भेटतो, असे जयस्वाल दाम्पत्याने सांगत पुन्हा वेळ मारून नेली. मात्र, त्या घरावर जेव्हा बँकेची जप्तीची नोटीस लागली, त्यावेळेस मात्र हा सर्व प्रकार उघडकीस आला. जयस्वाल फसवणूक केल्याचे लक्षात चौघांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. जनार्दन गायकवाड यांच्याकडून 2 लाख रुपये, विजय शिरसाट 1 लाख 50 हजार रुपये, योगेश भामरे 1 लाख 50 हजार रुपये, आशा नागरेंकडून 1 लाख 20 हजार रुपये असा एकूण सहा लाख 20 रुपयांना गंडा घातला. बँकेने या घराला सील केले असून, फसवणूक झालेल्या चौघांना पैसे कसे मिळणार असा प्रश्न पडला आहे. नागरिकांनी जयस्वाल दाम्पत्यांपासून सावध राहावे, त्यांच्याबरोबर कोणताही आर्थिक व्यवहार करू नये व ते आढळल्यास 8928720422 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन फसवणूक झालेल्या व्यक्तींनी केले आहे.

First Published on: August 2, 2022 12:50 PM
Exit mobile version