आठ महिन्याच्या बाळाला वडिलांनी टाकीत बुडवून केले ठार

आठ महिन्याच्या बाळाला वडिलांनी टाकीत बुडवून केले ठार

चाकण उद्योगनगरीत कामाच्या निमित्त रहायला आलेल्या मुळचे नेपाळ येथील एका व्यक्तीने त्याच्या ८ महिन्याच्या चिमुकल्या मुलाला पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साहिल चक्र (सोनार) वय ८ महिने असे चिमुकल्या मुलाचे नाव आहे. सोनार दाम्पत्य हे नेपाळ देशातील आछाम जिल्ह्यातील सापेबगर तालुक्यातील गाबिश या गावाहून चाकण येथे स्थायिक झाले आहे. पती चक्र उर्फ राजू व पत्नी निर्मला व दोन मुले असा परिवार चाकणच्या नाणेकरवाडी येथील ज्योतिबानगरमधील एका चाळीत भाड्याने राहत होते. चाकण उद्योगनगरीचा विस्तार औद्योगीकरणांबरोबर देश-विदेशातुन येणाऱ्या कामगारांमुळे दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कामाच्या शोधात आलेली कुटुंब मिळेल त्या पद्धतीने काम करुन भाड्यांच्या खोल्यांमध्ये छोटासा संसार चालवतात. मात्र अशा छोट्याशा संसारात पत्नी निघून गेल्याने कुटंबावर काळाच डोंगर कोसळला आणि त्यामध्ये एका चिमुकल्याचा बळी गेला आहे.

काय आहे घटना?

चाकण नानेकरवाडी जवळील ज्योतिबा नगर येथे मूळचे नेपाळ येथील असणारे सोनार कुटुंब काही दिवसांपूर्वी राहायला आले यामध्ये पती पत्नी दोन लहान मुले असाच छोटासा संसार एका भाड्याच्या खोलीत सुरू होता. त्यानंतर काल रात्रीच्या सुमारास आरोपी चक्र उर्फ राजू व पत्नी निर्मला यांच्यात भांडण झाले याच भांडणाचा राग मनात धरून पत्नी निर्मला ही आज पहाटेच्या सुमारास आपल्या दोन्ही चिमुकल्या मुलांना आणि राजूला सोडून कुठेतरी निघून गेली. पत्नी आपल्या मुलांना व आपल्याला सोडून गेली. याचा राग मनात धरून आरोपी राजू याने आपल्या आठ महिन्याच्या मुलाला राहत असलेल्या इमारतीच्या बाजूस शौचालयाजवळील टाकीमध्ये बुडवून ठार केले. सदर मुलाचे प्रेत चाळीतीर रहिवासी दूधनाथ रामेश्वर पासवान या भाडेकरूने पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर स्थानिकांनी राजूविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी काहीच वेळात राजूला ताब्यात घेतले.

First Published on: October 19, 2018 7:50 PM
Exit mobile version