St workers strike: एसटी कामगारांचा संप मिटणार? आज सकाळी ११ वाजता निर्णय जाहीर करणार

St workers strike: एसटी कामगारांचा संप मिटणार? आज सकाळी ११ वाजता निर्णय जाहीर करणार

परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी शिष्टमंडळ यांच्यामध्ये काल, बुधवारी चर्चा झाली. या चर्चेनंतर सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक पगारवाढ जाहीर केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात सरासरी ४१ टक्क्यांची वाढ होणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. म्हणजेच ज्यांना १२,५०० रुपये पगार आहे, त्यांना आता १७,५०० रुपये पगार मिळणार आहे. मात्र राज्य सरकारने पगारवाढ करूनही एसटी कर्मचाऱ्यांचा अजूनही संप सुरू आहे. एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. पण कर्मचाऱ्यांशी चर्चा करून आज संपावरचा निर्णय घोषित करणार असल्याची माहिती भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. त्यामुळे आज तरी एसटी संपाबाबतचा तिढा सुटणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

बुधवारी पगारवाढ जाहीर करताना कोर्टाच्या निर्णयानुसार स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालानंतर विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांनी तातडीने कामावर हजर रहावे, असे आवाहनही अनिल परब यांनी केले. मात्र एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्यामुळे आजही कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.

मुंबई, नाशिक, सोलापूर, पुणे, नागपूर, रत्नागिरी, औरंगाबाद अशा काही ठिकाणी आजही एसटी संप सुरुच आहे. शिवशाही आणि खासगी बसेस वगळता एसटी सेवा ठप्प आहेत. त्यामुळे आता संपाबाबत एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर आज सकाळी ११ वाजता भूमिका मांडू अशी माहिती सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीनंतर राज्य सरकार आणि एसटी महामंडळावर वर्षाला ६०० कोटींचा भार येणार आहे.


हेही वाचा – ST Workers Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ, १० तारखेपर्यंत होणार पगार, अनिल परबांची घोषणा


 

First Published on: November 25, 2021 8:36 AM
Exit mobile version