नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक होणार ; जाणून घ्या वैशिष्ट्ये

नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक होणार ; जाणून घ्या वैशिष्ट्ये

नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक होणार ; जाणून घ्या वैशिष्ट्ये

नवी मुंबई, खारघर येथील फुटबॉल उत्कृष्टता केंद्राचे उद्धाटन दूरदृश्यप्रणालीव्दारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दिनांक 16 जानेवारीला करण्यात आले. नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा हिंदुस्थानचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, तंत्रज्ञान विकसित होत असताना सध्याच्या पिढीची मैदानाशी, मातीशी नाळ तुटत चालली आहे. मात्र या उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून ही नाळ मातीशी पुन्हा जोडली जाईल. आरोग्यदायी जीवनासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. खारघर येथे निर्माण झालेले हे उत्कृष्टता केंद्र नव्या पिढीसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरेल. येथे विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, याहून अधिक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यासाठी नगरविकास विभाग, सिडको यांनी आतापर्यंत केलेले काम निश्चितच अभिनंदनीय आहे.

फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरची काय आहेत वैशिष्ट्ये ?

महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये काही सामाने खेळविण्यात येणार आहे.सिडकोव्दारे विकसित करण्यात येणार्‍या आंतराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क मध्ये 10.50 हेक्टर क्षे़त्रावर उत्कृष्टता केंद्र प्रकल्प अंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या नैसर्गिक गवताच्या फुटबॉल मैदानावर वरील सामन्याकरिता सहभागी झालेल्या संघाना सराव करण्याकरिता या मैदानांची निवड वेर्स्टन इंडिया फुटबॉल असोसिएशन शिफारशीद्वारे करण्यात आली असून वरील 02 नैसर्गिक गवताच्या फुटबॉल मैदानावर सिडकोतर्फे वेर्स्टन इंडिया फुटबॉल असोसिएशनला सरावाकरिता विनामोबदला देण्यात येणार आहे.


हेही वाचा – Indian Army Combat Uniform : भारतीय लष्कराच्या जवानांचा नवा कॉम्बॅट युनिफॉर्म पाहिलात ? जाणून घ्या वैशिष्ट्ये


 

 

 

First Published on: January 16, 2022 7:54 PM
Exit mobile version