धक्कादायक! तरुणीवर कारमध्ये केला बलात्कार आणि…

धक्कादायक! तरुणीवर कारमध्ये केला बलात्कार आणि…

अत्याचार

राज्यभरात कोरोनाचा कहर सुरू असताना कोरोनाचा वाढता आकडा ऐकून लोकं हैराण होत आहे तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना यादरम्यान एक धक्कादायक प्रकार अहमदनगरमध्ये घडल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊन दरम्यान कारमध्ये एका तरुणीवर बलात्कार करून पीडित तरुणीला विवस्त्र अवस्थेत भररस्त्यावर सोडून नराधमांनी पळ काढला आहे. या घटनेनंतर नगर शहर पुर्णतः हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगर शहरातील कल्याण रोडवरील रेल्वे पुलाजवळ एका तरुणीवर कारमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर पीडित तरुणी विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान पीडित तरुणी ही मूळची वर्धा जिल्ह्यातील असून तिच्यावर शिंगवे नाईक येथील माऊली सेवा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेत उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये अत्याचार करणाऱ्याविरोधात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पीडितेनं दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी आरोपी आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे येथे राहणाऱ्या अभय बाबूराव कडू याला ताब्यात घेतले आहे.

मनोरुग्ण तरूणीला विवस्त्र अवस्थेत रस्त्यावरच सोडून पसार

वर्धा जिल्ह्यातील ही तरूणी असून ती मनोरुग्ण आहे. ती वर्धा येथून पळून आली असताना तिचा संपर्क अभय कडू याच्याशी आला. कडू याने त्याच्या वाहनात बसून तरूणीला पुण्यात नेले. यानंतर तो तिला घेऊन पुण्यातून नगरमध्ये सोमवारी पहाटे दाखल झाला. कल्याण रोडवरील रेल्वे ब्रीजजवळ कडू याने पीडितेवर कारमध्ये अत्याचार केला, असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या पीडितेला विवस्त्र अवस्थेत रस्त्यावरच सोडून तो पसार झाला. सोमवारी सकाळी नगर शहरातील चांदणी चौक येथे एक तरुणी विवस्त्र अवस्थेत धावत असल्याचे काही लोकांनी पाहिले. त्यानंतर याची माहिती माऊली सेवा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेला दिली गेली. त्यानंतर या तरुणीला एका रुग्णवाहिकेतून संस्थेत दाखल करण्यात आले, असेही सांगितले.


पत्नीचे १४ प्रियकर! पतीने सर्वांना पाठविली नोटीस अन्…

First Published on: July 22, 2020 11:36 PM
Exit mobile version