गौतम अदानींची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करावी; उद्धव ठाकरेंची मागणी

गौतम अदानींची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करावी; उद्धव ठाकरेंची मागणी

उद्योगपती गौतम अदानी यांची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. एका वृत्तपत्राच्या विशेष कार्यक्रमानिमित्त दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मागणी केली. तसेच, या प्रकरणात जेपीसी चौकशी का महत्त्वाची आहे, यावरही ठाकरेंनी भाष्य केले आहे.

“सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे कष्टाचे हजारो कोटी रुपये कुठे गेले, याचा शोध घेण्यासाठी अदानी उद्योग समूहाची नि:पक्षपातीपणे चौकशी झालीच पाहिजे. ती संयुक्त संसदीय समितीद्वारे केली जावी. करण्यात येणारी चौकशी ही नि:पक्षपाती आणि लवकरात लवकर झाली पाहिजे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले. (The Inquiry Should Be Conducted By A Joint Parliamentary Committee Uddhav Thackerays Big Statement In The Adani Inquiry Case vvp96)

“संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात फुलवाल्याची चौकशी केली जाते. जर फुलवाल्याची चौकशी केली जात असेल तर हजारो कोटी रुपयांचे प्रकरण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी उद्योग समूहाबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले. अशा वेळी या उद्योग समूहाच्या कारभाराबद्दल सर्वसामान्यांना प्रश्न पडले आहेत, त्यात मीसुद्धा असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यांना प्रश्न विचारले आहेत ते उत्तर का देत नाहीत, असाच प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात असल्याचे ठाकरे म्हणाले. उत्तर दुसऱ्याने किंवा अन्य कोणी तरी देण्यापेक्षा ज्याला प्रश्न विचारला आहे त्यानेच ते दिले पाहिजे. ज्यांना प्रश्न विचारले आहेत त्यांच्याकडे माहिती नसल्यास संबंधितांकडून माहिती घेऊन त्यांनी उत्तर द्यावे. प्रश्न विचारणारा एक, ज्याला विचारला तो दुसरा, उत्तर देणारा तिसरा आणि ऐकणारा चौथा हे सगळे संशयाचे धुके वाढवणारे असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.


हेही वाचा – अतिक अहमद मृत्यूप्रकरण : उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जाहीरपणे शोक व्यक्त करतायत…. – आशिष शेलार

First Published on: April 16, 2023 4:12 PM
Exit mobile version