घरमुंबईअतिक अहमद मृत्यूप्रकरण : ठाकरे आणि राऊतांना शोक..., आशिष शेलारांची टीका

अतिक अहमद मृत्यूप्रकरण : ठाकरे आणि राऊतांना शोक…, आशिष शेलारांची टीका

Subscribe

मुंबई : अतिक अहमद (atiq ahmad) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf) यांच्यावर शनिवारी (15 एप्रिल) रात्री 10 च्या आसपास हल्ला करण्यात आला, यात दोघांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याप्रकरणी ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पोलीस बंदोबस्तात हत्या होणे गंभीर बाब असल्याचे म्हणत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला होतो. यावर आता भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish shelar) यांना संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – पोलीस बंदोबस्तात हत्या होणे गंभीर, अतिक अहमद प्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया

- Advertisement -

अतिक अहमद, त्यांच्या मुलाचा आणि त्यांचा भावाचा युपीमध्ये एन्काऊंटमध्ये मृत्यू झाला; मात्र संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये त्रास होत आहे. यांचा काय संबंध आहे?, असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, अतिक अहमदवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.  आरोपींना पकडण्यात आले आहे. पण संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना मगरीचे अश्रू ढाळत आहेत. आता उद्धव ठाकरे, आदित्य आणि संजय राऊत अतिक अहमदच्या मृत्यूवर छाती पिटत आहेत. सार्वजनिक ठिकाणी शोक व्यक्त करताना दिसतील, असे आशिष शेलार म्हणाले.

 …यांना कायदा सुव्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार नाही
उत्तर प्रदेश सरकार कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित चालवत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आहे का?, असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला.  त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पोलीसांच्या पाठी पोलीस लागत होते, चोराच्या मागे पोलीस लागत नव्हते. त्यांचे सरकार असताना पोलीस कुणाच्या तरी घरी स्फोटके पेरत होती. त्यामुळे यांना कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार नाही. अतिक अहमद यांच्या निधनानंतर सामुहिक शोक व्यक्त करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी करावे, असे आशिष शेलार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -