वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची, जयंत पाटलांचा राज ठाकरेंवर पलटवार

वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची, जयंत पाटलांचा राज ठाकरेंवर पलटवार

मुंबई : वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
2014 ला मोदींना पाठिंबा आणि 2019 ला मोदींना विरोध आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर, अशी जोरदार खिल्ली जयंत पाटील यांनी राज ठाकरेंची उडवली आहे.

पुतण्या माननीय बाळासाहेब ठाकरेंचा, मात्र नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी आहे. वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत, असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘जंत पाटील’ चकीत चंदूसारखे असतात

विशेष म्हणजे राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेत जयंत पाटलांना जंत पाटील म्हणून संबोधत टीकास्त्र डागलं. जंत पाटील नेहमी चकीतचंदू सारखे असतात. जंत पाटील म्हणतात (जयंत पाटील) हे कधी गेले होते यूपीमध्ये ज्यांना आता यूपीचे कौतुक वाटतं. त्यांनी माझे भाषण एकदा ऐकावं, मी म्हटलं ज्या बातम्या कानावर येत आहेत त्याप्रमाणे यूपीत विकास झाला असेल तर मला आनंद आहे. माझी भाषा ही जर तरची आहे. तुम्हाला आठवत असेल तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सतत म्हणत होतो नरेंद्र मोदी पीएम होतील ते झाल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्याचा विकास करावा, या तीन राज्यांतून जी लोकं महाराष्ट्रात येतात त्यांचे ओझं महाराष्ट्र सहन करु शकत नाही. माझी सगळी भाषणे काढून पाहा, असंही राज ठाकरे म्हणाले होते.


हेही वाचा : …म्हणून शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत, राज ठाकरेंचा घणाघात

First Published on: April 12, 2022 11:08 PM
Exit mobile version