औरते उठ्ठी नही तो जुल्म बढता जायेगा!

औरते उठ्ठी नही तो जुल्म बढता जायेगा!

Womens Long march

‘औरते उठ्ठी नही तो जुल्म बढता जायेगा’ हे ब्रीद वाक्य घेऊन ६ एप्रिल रोजी आदिवासी, मोलकरणी, विद्यार्थिनी व इतर मध्यमवर्गीय महिला एकत्रित येऊन रायगड बाजार येथून मिरवणूक काढणार आहेत. यात सर्व जात, धर्म पंथाच्या महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महिला अत्याचार विरोधी मंचाच्या मोहिनी गोरे, नीता कदम, ज्योती राजे यांनी केले आहे.
देशातील महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी हिंसा, भीती आणि द्वेष या भावनांच्या विरोधात महिलांची एकजूट होऊन देशभर 4 एप्रिल रोजी लाँग मार्च काढणार आहेत.

यास महिला अत्याचार विरोधी मंच व महिला किसान अधिकार मंचाने पाठिंबा दिला आहे. याबाबत येथे झालेल्या बैठकीत जात, धर्म, वर्ग, संस्कृती यांच्या अभेद्य भिंती तोडत स्थानिक वंचित समाजातील महिलांनी सार्वजनिकरित्या दरवर्षी प्रमाणे गुढी उभारण्याचे घोषित केले आहे.याबाबत झालेल्या बैठकीत सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी ‘मकाम’तर्फे प्रसिध्द झालेले जाहीर पत्रक वाचून दाखवले. याबाबत कृती कार्यक्रम म्हणून महिलांना संघटित होण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीच्या निर्भया प्रकरणानंतर येथे महिला अत्याचार विरोधी मंचाची स्थापना करण्यात आली. नुकतेच सावित्रीबाई फुले जयंतीपासून ते संक्रांतीपर्यंत या मंचातर्फे ‘मी पण’ अभियान राबविण्यात आले होते. याद्वारे जागृती करून अनेक वंचित महिलांना आपले न्याय हक्क मिळवून दिले होते.

First Published on: April 4, 2019 4:01 AM
Exit mobile version