शिंदे गटाच्या आमदाराला ग्रामस्थांनी लावलं पळवून, वैजापुरात जोरदार राडा

वैजापूर – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर अनेक आमदारांनी ठाकरे गटाला दणका दिला. ठाकरे गटातून अनेकजण शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे वैजापूर गंगापूर मतदारसंघाचे शिंदे गटातील आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांनी ग्रामस्थांचा रोष पत्कारावा लागला आहे. महालगावातून त्यांना ग्रामस्थांनी चक्क हाकलून दिल्याची घटना समोर आली आहे.

हेही वाचा – ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का, माजी आमदार शिंदे गटात सामील

आमदार रमेश बोरनारे एका कार्यक्रमासाठी वैजापुरातील महालगावात गेले होते. त्यावेळी त्यांना ग्रामस्थांनी गावात येण्यापासून रोखलं. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. रमेश बोरनारे यांनी गावाचा प्रवेश करण्यापासून ग्रामस्थांनी रोखल्याने दोन गटांत हाणामारी झाली. मात्र, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढचा अनर्थ टळला. त्यामुळे प्रकरण आणखी वाढू नये याकरता आमदार बोरनारेंनी महालगावातून पाय काढला.

आमदार रमेश बोरनारे हे पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेचे दिग्गज नेते आरएम वाणी यांचे ते निकवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्याने वैजापुरात मोठा रोष निर्माण झाला आहे.

शिंदे गटात प्रवेश

शिवसेनेला (Shivsena) लागलेल्या बंडखोरीचं ग्रहण कमी होताना दिसत नाहीय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray Group) मोठे खिंडार पडले. आता शिवसेनेतील आणखी एक माजी आमदार शिंदे गटात सामील झाला आहे. माजी आमदार कृष्णा हेगडे (Former MLA Krushna Hegde) यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून त्यांच्यासोबत असंख्य समर्थकांनीही शिंदे गटाला जवळ केले आहे.

First Published on: November 29, 2022 1:19 PM
Exit mobile version