ठरलं! शिंदे गटाचं नाव ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, लवकरच घोषणा होणार

ठरलं! शिंदे गटाचं नाव ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, लवकरच घोषणा होणार

मुंबईः एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या उलाढाली होत आहेत. शिंदेंकडे जवळपास 41 आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी आपल्या गटाचं नाव निश्चित केलं आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नाव शिंदेंच्या गटाचं ठरवण्यात आलं असून, लवकरच शिंदे गटाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. शिंदे गट या नावासाठी लवकरच निवडणूक आयोगाकडे अर्ज करू शकतो. पण शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना वापरता येणार नाही की नाही हे लवकरच समजणार आहे.

विशेष म्हणजे या सर्व घडामोडींवर शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, शिवसेना बाळासाहेब असं नाव ठेवलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आमची बांधिलकी कायम आहे. आम्ही स्वतंत्र गट स्थापन केलेला आहे. पण आम्ही कोणामध्येही विलीन होणार नाही. गटाचं अस्तित्व स्वतंत्र राहणार आहे. त्यामुळे जो गैरसमज महाराष्ट्रात पसरवला जातोय, तो साफ चुकीचा आहे. कोणीही पक्षामधून बाहेर पडलेलं नाही. परंतु विधिमंडळात आमची भूमिका वेगळी असणार आहे. कारण आपण एकत्र निवडणुका लढवल्या. एकत्र निवडणुका लढवूनसुद्धा आपण भाजपपासून दूर झालो. त्याने भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर आले का?, त्यांनी मोडतोड केली का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

आपण त्यांचे पोस्टर लावले, आपण मोदींचे पोस्टर लावले. आपण सगळं केलं ना पण तरीपण उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला आणि आम्ही तो मान्य केला. परंतु शिवसेनेच्या आमदारांचं आणि खासदारांचं अस्तित्वच संपवायला मित्र पक्ष निघाले, त्यावेळी ही भूमिका घ्यावी लागली, गेल्या दीड-दोन वर्षांपासून हीच भूमिका आहे. ही भूमिका सातत्याने आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलेली आहे. एवढा काळ गेलेला आहे, त्यातून कन्फ्युजन क्रिएट झालेले आहेत, असंही त्यांनी अधोरेखित केलंय.


हेही वाचाः …म्हणून आमदारांची आणि कुटुंबांची सुरक्षा काढली, शिंदेंचं ट्विट करत ठाकरेंवर बाण

First Published on: June 25, 2022 1:08 PM
Exit mobile version