राज्यात तीन महिन्यात ८० हजार करोना रुग्ण

राज्यात तीन महिन्यात ८० हजार करोना रुग्ण

राज्यात शुक्रवारी २४३६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून करोनाबाधित रुग्णांची संख्या ८० हजार २२९ झाली आहे. तसेच १३९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या २८४९ वर पोहोचली आहे. शुक्रवारी १४७५ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने, राज्यात आजपर्यंत ३५ हजार १५६ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

मुंबई ५४, ठाणे ३०, वसई विरार १, कल्याण-डोंबिवली ७, भिवंडी १, जळगाव १४, नाशिक २, मालेगाव ८, पुणे १४, सोलापूर २, रत्नागिरी ५, औरंगाबाद १ असे मृत्यू आहेत. मृत्युंपैकी ७५ पुरुष तर ६४ महिला आहेत. १३९ मृत्युंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७८ रुग्ण आहेत तर ५३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहेत. या १३९ रुग्णांपैकी ११० जणांमध्ये ( ७९ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. मृत्युंपैकी २७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २१ एप्रिल ते २ जूनदरम्यानचे आहेत. या कालावधीतील ११२ मृत्यूंपैकी मुंबई ४१, जळगाव १३, ठाणे ३०, कल्याण डोंबिवली ७, मालेगाव ८, रत्नागिरी ५, पुणे ३, भिवंडी १, सोलापूर २, नाशिक २ असे मृत्यू आहेत.

करोना निदानासाठी सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५,२२,९४६ नमुन्यांपैकी ८०,२२९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याचे प्रयोगशाळा चाचण्यांचे दर दशलक्ष प्रमाण ३८२७ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २८३२ इतके आहे.

राज्यात सध्या कंटेनमेंट ३४७९ झोन क्रियाशील असून आज एकूण १८,०२६ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६९.१८ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ५,४५,९४७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२,३७५ खाटा उपलब्ध असून सध्या ३०,२९१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: June 6, 2020 7:24 AM
Exit mobile version