‘कोरोना विरुद्धच्या लढाईतील पोलीस योद्धांना आपत्ती सेवा पदकाने गौरविले जाणार’

‘कोरोना विरुद्धच्या लढाईतील पोलीस योद्धांना आपत्ती सेवा पदकाने गौरविले जाणार’

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यात अगदी ग्राम पातळीपर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य निभावले आहे. त्या सर्व पोलिसांचा ‘आपत्ती सेवा पदक’ देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

४२ पोलिसांचा कोरोनामुळे बळी

हे सर्व करत असताना पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना संसर्ग झाला. त्यासही न डगमगता आपल्या पोलीस बांधवांनी आपले कर्तव्य सुरूच ठेवले. दुर्दैवाने आपल्या ४२ पोलीस बांधवांना यात वीरगती देखील प्राप्त झाली आहे.

राज्यातील पोलीस बांधवांना सन्मानित करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी गृह विभागातर्फे आपत्ती सेवा पदक देऊन पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि गौरव करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – खळबळ! पालघर लिंचिंगमधील ११ आरोपींना कोरोना


 

First Published on: June 16, 2020 10:13 PM
Exit mobile version