करोना व्हायरस : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका; दुसरा व तिसरा वनडे सामना रद्द

करोना व्हायरस : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका; दुसरा व तिसरा वनडे सामना रद्द

करोना व्हायरस : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा व तिसरा वनडे सामना रद्द

धरमशाला येथे खेळला जाणारा भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या वनडे मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. परंतु, आता भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा व तिसरा वनडे सामना करोना व्हायरसमुळे रद्द करण्याची वेळ आली आहे. करोना व्हायरसचा धक्का आता भारतीय क्रिकेटलाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. बीसीसीआयने भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील उर्वरित दोन सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा – २९ मार्च ऐवजी १५ एप्रिलपासून सुरू होणार आयपीएल


 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा आणि तिसरा सामना रिकाम्या मैदानात म्हणजेच प्रेक्षकांविना खेळवला जाईल, असा निर्णय याआधी बीसीसीआयने घेतला होता. दोन्ही संघादरम्यान, १५ मार्च रोजी दुसरी वनडे लखनऊ येथे तर तिसरी १८ मार्च रोजी कोलकाता येथे खेळवण्यात येणार होती. पण आता पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार हे दोन्ही सामने रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींकडून नाराजीही व्यक्त होताना दिसून येत आहे.


हेही वाचा – पावसामुळे भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका वन डे मालिकेचा पहिला सामना रद्द


 

याशिवाय २९ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल ही आता १५ एप्रिल रोजी सुरू होणार आहे. नागरिकांनी शक्यतो गर्दी टाळावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे नागरिकांनी क्रिकेटचे सामने स्टेडियममध्ये न जाता घरी टीव्हीवरूनच पाहावे, असेही सांगण्यात आले आहे.

First Published on: March 13, 2020 6:50 PM
Exit mobile version