T20 WC 2024 Squad : हार्दिक, पंत अन् राहुलला डच्चू; 6 वेळच्या आयपीएल विजेत्यानं कोणाला दिली संधी?

T20 WC 2024 Squad : हार्दिक, पंत अन् राहुलला डच्चू; 6 वेळच्या आयपीएल विजेत्यानं कोणाला दिली संधी?

नवी दिल्ली : आयपीएल 2024 नंतर भारतीय संघ जून महिन्यात टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळताना दिसणार आहे. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलच्या मध्यावरच भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. सध्या आयपीएलमध्ये अनेक युवा खेळाडू चांगले प्रदर्शन करताना दिसत आहेत. त्यामुळे दिग्गज खेळाडूंना संधी न देता युवा खेळाडूंना संधी द्या अशी चर्चा रंगली आहे. अशातच आता भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू यांने टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे अंबाती रायडूच्या संघात दोन अनकॅप्ड खेळाडूंचाही समावेश केला आहे. (6 time IPL winner picks squad for T20 World Cup)

2024 च्या टी-20 विश्वचषकातील भारतीय संघाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. माजी खेळाडू आपापली मते मांडत आहे. अशातच आता अंबाती रायुडूनेही आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. अंबाती रायुडूने आपल्या 15 सदस्यीय संघातून हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, इशान किशन आणि केएल राहुल या खेळाडूंना वगळले आहे. तर दिग्गज दिनेश कार्तिकची निवड केली आहे. दिनेश कार्तिक यंदाच्या आयपीएलमध्ये फिनिशरची भूमिका चोख बजावताना दिसत आहे. त्यामुळे अंबाती रायडूने त्याची निवड केली आहे.

अंबाती रायडूने दोन अनकॅप्ड खेळाडू म्हणजेच रियान पराग आणि मयंक यादव यांचा आपल्या संघात समावेश केला आहे. रियान पराग हा रायस्थान रॉयल्ससाठी आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करत आहे, तर मयंक यादव हा लखनऊ सुपर जायंट्ससाठी खेळताना अप्रतिम गोलंदाजी करत आहे. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे.

अंबाती रायडूचा संभाव्य 15 सदस्यीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रियान पराग, दिनेश कार्तिक, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव.

हेही वाचा – IPL 2024 Points Table : गुजरातचा पराभव करत दिल्लीची चेन्नईशी बरोबरी; प्ले-ऑफची शर्यत रोमांचक

दोन जूनपासून विश्वचषकाचे बिगुल वाजणार (T20 World Cup Start 2 June )

दरम्यान, यंदाचा टी-20 विश्वचषक येत्या 2 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ टी-20 विश्वचषकात खेळताना दिसणार आहे. विश्वचषकाला फक्त 1 महिना बाकी असल्याने बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर भारतीय संघाची घोषणा येत्या 29 किंवा 30 एप्रिल रोजी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात कोणला संधी मिळते आणि कोणाचा पत्ता कट होतो, हे पाहावे लागेल.

First Published on: April 25, 2024 5:43 PM
Exit mobile version