अपात्रतेसंदर्भात निर्णय घेताना अध्यक्षांना ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्यांना विचारात घ्यावे लागणार

अपात्रतेसंदर्भात निर्णय घेताना अध्यक्षांना ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्यांना विचारात घ्यावे लागणार

मुंबई | “अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय घेताना, प्रतोद सुनील प्रभू आणि गटनेते अजय चौधरी विचारात घ्यावा लागेल”, अशी माहिती ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बोलातना दिली आहे. राज्याच्या सत्तासंघर्षावर १६ आमदारांच्या अपात्रेवर विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सांगितले आहे. यामुळे आता अध्यक्षांची (Legislative Assembly Speaker) शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“विद्यमान विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांना गटनेते आणि भरत गोगावले यांची प्रतोपदी केलेली नियुक्ती न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आहे. म्हणजे आमदारांच्या अपात्रेची सुनावणी करताना अध्यक्षांना तेव्हाचे सुनील प्रभू यांचे व्हीप आणि गटनेते अजय चौधीर यांचा विचारात घाव लागेल”, असे उज्ज्वल निकम म्हणाले.

उज्ज्वल निकम म्हणाले, “अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रेसंदर्भात एक वेळेत निर्णय घ्यावा लागणार आहे आणि संबंधित आमदार अध्यक्षांपुढे कधी येणार? या वाजवी वेळ अवलंबून असणार आहे. अध्यक्षांना घाईत निर्णय घेता येणार नाही. तसेच आमदारांनी पक्ष सोडला नाही किंवा अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी कारण द्यावे लागणार आहे.”

अध्यक्षांना १६ आमदारांच्या अपात्रेवर सुनावणी घ्यावी लागेल

सुनील प्रभू हेच प्रतोद, त्याआधारे कारवाईची मागणी करतोय, असे अनिल परब यांनी म्हटले. याबद्दल विचारल्यावर उज्ज्वल निकम यांनी सांगितले, “तेव्हाचे प्रतोद सुनील प्रभूंनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना कळवल्यानंतर १६ आमदारांविरोधात अपात्रतेची नोटीस बजावली होती. त्यामुळे अध्यक्षांना १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई प्रथम करावी लागणार आहे. सुनील प्रभूंनी काढलेल्या नोटीसीवर आधारीत राहणार आहे. या आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर विधानसभा अध्यक्षांना सुनावणी घ्यायची आहे.”

 

First Published on: May 12, 2023 8:08 PM
Exit mobile version