चीनी कंपन्यांची महाराष्ट्रात ५ हजार कोटींची गुंतवणूक, ठाकरे सरकारच्या निर्णयाकडे लक्ष!

चीनी कंपन्यांची महाराष्ट्रात ५ हजार कोटींची गुंतवणूक, ठाकरे सरकारच्या निर्णयाकडे लक्ष!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गेले दोन दिवस भारत- चीन नियंत्रण रेषेवर २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर शहीदांचे बलीदान वाया जाऊ देणार नाही चीनला जशास तसे उत्तर देऊ असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. एकीकडे केंद्र सरकार चीनी वस्तू देशातून हद्दपार करण्यासाठी योजना आखत आहेत. तर दुसरीकडे मात्र महाराष्ट्र सरकारने तीन चिनी कंपन्यांसह वेगवेगळ्या देशांतील १२ कंपन्यांसमवेत १६,००० कोटी रुपयांचे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग (सामंजस्य करार/ MOU) वर सह्या केल्या आहेत. महाराष्ट्रात चिनी कंपन्यांनी एकत्रितपणे ५०००  कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक होण्यापूर्वी सोमवारी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0’ अंतर्गत हा सामंजस्य करार झाला.

या निवेदनात म्हटले आहे की, हेंगली इंजिनिअरींग २५० कोटी आणि पीएमआय ऑटो क्षेत्रात १००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्याचबरोबर ग्रेट वॉल मोटर्स ३,७७० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह एक ऑटोमोबाईल कंपनी स्थापन करणार आहे. या कंपन्या पुणे जिल्ह्यातील तळेगावमध्ये गुंतवणूक करतील. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

या कंपन्यांशी झाला करार

अमेरिका, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी कंपन्यांशी हे करार झाले आहेत. ते म्हणाले की, या कंपन्या ऑटोमोबाईल, लॉजिस्टिक्स, बँकिंग, अभियांत्रिकी आणि मोबाइल उत्पादन अशा विविध क्षेत्रातील आहेत.

या कंपन्या गुंतवणूक करणार

एक्झॉन मोबिल (यूएस) तेल आणि वायू – इसाम्बे, रायगड – ७६० कोटी रुपये

हेनगली (चीन) अभियांत्रिकी- तळेगाव, पुणे – २५० कोटी

सेंडास (सिंगापूर) लॉजिस्टिक- चाकण- तळेगाव, पुणे, भिवंडी, ठाणे ५६० कोटी रुपये

एपीजी डिसी (सिंगापूर) डेटा सेंटर- टीटीसी, ठाणे- महापे ११०० कोटी

इस्टेक (दक्षिण कोरिया) इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम डिझाइन – रांजणगाव, पुणे १२० कोटी

पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेव्ही विथ फोटॉन (चीन) ऑटो-तळेगाव – १००० कोटी रुपये

रॅकबँक (सिंगापूर) डेटा सेंटर – ठाणे, हिंजवडी, पुणे १५०० कोटी रुपये

ग्रेट वॉल मोटर्स (चीन) ऑटो मोबाइल तळेगाव – पुणे – ३७७० कोटी रुपये


हे ही वाचा – चीनमध्ये नाही तर SAMSUNG ला करायची आहे भारतात गुंतवणूक!


 

First Published on: June 18, 2020 11:49 AM
Exit mobile version