महिलेने राज्यमंत्री दत्ता भरणेंची धरली कॉलर, वाचा नक्की झालं तरी काय!

महिलेने राज्यमंत्री दत्ता भरणेंची धरली कॉलर, वाचा नक्की झालं तरी काय!

महिलेने दत्ता भरणे यांची धरली कॉलर, वाचा नक्की झालं तरी काय

आपल्या मुलावर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा दावा करत, एका महिलेने राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या घरासमोर उपोषण सुरु केले होते. या उपोषणस्थळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे गेले असता महिलेने थेट त्यांच्या शर्टला पकडून जाब विचारल्याने राज्यात एकच खळबळ माजली आहे. या महिलेने तिच्या मुलावरती खोट गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा दावा केला आहे. ही महिला इंदापूर तालुक्यातील रेडणी गावची रहिवासी आहे. दीड महिन्यांपूर्वी प्रफुल्ल चव्हाण आणि सचिन तरंगे यांनी संभाजी चव्हाण यांच्यविरुद्ध ३९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर संभाजी चव्हाण यांनी प्रफुल्ल चव्हाण आणि सचिन तरंगे यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. यामुळे न्यायासाठी प्रफुल्ल चव्हाणची आई शोभा चव्हाण यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर उपोषण सुरु केले होते.

महिलेने असा दावा केला आहे की, प्रफुल्ल आणि सचिन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी ५ लाख खंडणी मागितली होती. खंडणीची रक्कम न दिल्याने मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यावर निलंबणाची कारवाई व्हावी अशी मागणी या महिलेने दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. या महिलेने थेट राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची कॉलर पकडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिय दिली आहे की, महिला माझ्या शर्टला हात लावून बोलत होती. तसेच माझा आणि त्यांच्या कुटुंबाचा मागील अनेक वर्षांपासून घरगुती संबंध आहेत. त्यांच्या मुलावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे माला रेडणी गावातूनही समजले आहे. जर हा गुन्हा खोटा असेल तर महिलेच्या मुलाच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे. दत्तात्रय भरणे यांच्या आश्वासनानंतर महिलेने आपले उपोषण मागे घेतले आहे.

First Published on: January 12, 2021 8:56 AM
Exit mobile version