पुणे-मुंबई रेल्वे प्रवास कधी होणार सुरू? मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट

पुणे-मुंबई रेल्वे प्रवास कधी होणार सुरू? मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट

प्रातिनिधीक फोटो

देशात लॉकडाऊन लागू झाल्यापासून रेल्वेची सेवा बंद आहे. त्यानंतर १ जूनपासून २०० स्पेशल रेल्वे सुरू केल्या आहेत. आता राज्य सरकारने जिल्हा बंदी रद्द केली असून प्रवाशांना राज्यातील एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी गुरूवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

पुणे मुंबई या मार्गावर महत्त्वाच्या कामानिमित्त ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे सुरू करण्याची मध्य रेल्वेची तयारी आहे. मात्र, राज्य सरकारने त्याची तयारी दर्शवून तशी मागणी करणे आवश्यक आहे, अस मध्ये रेल्वे पुणे विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान लॉकडाऊनमुळे गेल्या पाच महिन्यांपासून पुणे-मुंबई दरम्यानच्या एक्स्प्रेससह लोकल गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. या गाड्या सुरू करण्यास रेल्वे प्रशासनाची पूर्ण तयारी आहे. मात्र, राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय या गाड्या सुरू करता येणार नसल्याचे रेणू शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्य सरकारच्या निर्णयावर अवंलबून

केंद्र सरकारने देशातील मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी मुंबई मेट्रो सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारचा कोणताही निर्णय नाही आहे. तर मुंबईतील लोकलसेवा सुरू करण्याची मागणी होत असतानाही सरकारने त्याबाबत कोणताच निर्णय अद्याप घेतलेला नाही. राज्यात मिशन बिगिन अगेनचा पुढचा टप्पा १ ते ३० सप्टेंबर असा असणार असून या टप्प्यात जिल्हा बंदी उठवण्यात आली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने राज्यांतर्गत रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय मात्र राज्य सरकारच्या निर्णयावर अवंलबून आहे.

आणखी प्रतीक्षा करावी लागणार

त्यामुळे, अद्याप कोणत्याही प्रकारची मागणी राज्य सरकारने रेल्वेकडे करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्य सरकार येत्या काळात कोणती भूमिका घेणार याकडे रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. या मार्गावरून नियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाट पहावी लागणार हेच यावरून स्पष्ट होत आहे.


‘यात्रीगण कृपया ध्यान दे’, मध्य रेल्वेच्या उद्घोषकांवर आली उपाशी राहण्याची वेळ!

First Published on: September 4, 2020 8:13 AM
Exit mobile version