माझ्या मुलाला गाडीतून दरीत ढकलण्याचा कट होता, रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट

माझ्या मुलाला गाडीतून दरीत ढकलण्याचा कट होता, रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट

Yogesh Kadam Accident | मुंबई – आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांचा शुक्रवारी, ६ जानेवारी रोजी रात्री कशेडी घाटात अपघात झाला होता. याप्रकरणी माजी मंत्री रामदास कदम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांचा अपघात झाला नसून घातपाताचा प्रयत्न होता. त्यांना गाडीसह दरीत ढकलण्याचा कट होता, असा मोठा गौप्यस्फोट योगेश कदम यांनी केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदरसंघातील आमदार योगेश कदम खेडहून मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत त्यांचा अपघात झाला. मागून आलेल्या टँकरने गाडीला जोरदार धडक दिली. त्यामुळे योगेश कदम यांची गाडी पुढे असलेल्या पोलिसांच्या गाडीला धडकली. परिणामी चालकाला किरकोळ मार लागला. तर गाडीच्या पुढील भागाचे नुकसान झाले.

हेही वाचा – आणखी एका आमदाराच्या गाडीला अपघात, कशेडी घाटात टँकरने दिली धडक

मात्र हा अपघात नसून घातपात आहे, असं योगेश कदम यांचे वडील आणि माजी मंत्री रामदास कदम म्हणाले. “योगेश कदम अपघातप्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. चालकालाही अटक केली आहे. त्याने जबाब दिला होता की, ब्रेक फेल झाला होता. पण जेव्हा वाहनाची तपासणी केली तेव्हा ब्रेक फेल झाला नव्हता, असं समोर आलं. चालक खोटं बोलतोय. पुढे आणि मागे पोलिसांच्या गाड्या असताना त्या डंपरने योगेश कदमांच्या मधल्या गाडीला दीडशे फुटापर्यंत लांब रेटत नेलं. ती गाडी आणखी थोडं पुढं गेली असती तर दरीत कोसळली असती. असाच तो प्लॅन होता, असं मला वाटतं. योगेश कदमांची गाडी पुढच्या पोलिसांच्या गाडीली धडकली नसती तर त्याची गाडी खोल दरीत कोसळली असती,” असं रामदास कदम म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आमचं नशीब चांगलं होतं. लोकांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते. त्यामुळे माझा मुलगा बचवला. मात्र, तो चालक खोटं बोलतोय, हे सिद्ध झालं आहे. आता पोलिसांनी दोन ठिकाणी दोन तपास पथकं पाठवली आहेत. चालकाचं आतापर्यंतचं सर्व रेकॉर्ड तपासण्याचं काम सुरू आहे.”

First Published on: January 11, 2023 3:04 PM
Exit mobile version