लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा सुळसुळाट; 50 फोन अन् दागिने लंपास

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा सुळसुळाट; 50 फोन अन् दागिने लंपास

शुक्रवारी संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात गणपती विसर्जन पार पडले. जवळपास दोन दिवस सुरू असलेल्या मिरवणुकीला बाप्पांच्या भक्तांनी अलोट गर्दी केली होती. मुंबई आणि पुण्यातील सुप्रसिद्ध गणेश मंडळांच्या बाप्पाचे देखील थाटामाटात विसर्जन पार पडले. यावेळी मुंबईतील लालबागच्या राजाचे विसर्जन मिरवणुकीलाही अनेकांनी प्रचंड गर्दी केली होती.

गणेशोत्सवाचे दहा दिवस उत्साहात पार पडल्यानंतर अनंत चर्तुदर्शीच्या दिवशी शुक्रवारी दहा दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले. मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी देखील अनेक लाखो भक्तांची गर्दी जमली होती. शुक्रवारपासून लालबागच्या राजाला निरोप दिला जात आहे. मुंबई परिसरात रात्री उशीरापर्यंत मुरवणूक सुरू होती. पहाटे लालबाग राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला. त्यानंतर बाप्पाची शेवटची आरती पार पडली. कोळी समाजाकडून लालबागच्या राजा मानवंदना देणयात आली. सकाळी 9 :15 च्या सुमारास खोल सुमारास सुरक्षितरीत्या 22 तासांच्या मुरवणूकीनंतर अखेर लालबागच्या राजाचे विसर्जन पार पडले. गेले दहा दिवस लालाबागच्या राज्याची मनोभावे सेवा करणारे कार्यकर्ते भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, याचं गर्दीचा फायदा घेत चोरांनी देखील हातसफाई करण्याची एकही संधी सोडली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, लालबागच्या विसर्जन मुरवणुकीत चोरड्यांनी तब्बल 50 फोन, सोन्याचे दागिने आणि पाकिट चोरले आहेत. ज्या व्यक्तिंच्या या वस्तू लंपास झाल्या ते पोलिस स्टेशन बाहेर तक्रार नोंदवण्यासाठी गेले. पोलिस स्टेशनबाहेर देखील तक्रार दाखल करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तक्रार दाखल करण्यासाठी मुंबईमधील काळाचौकी पोलिस स्टेशनबाहेर तक्रार दाखल करण्यासाठी गर्दी केली होती.


हेही वाचा :

दहा दिवसांच्या गणेश विसर्जनात पावसाची हजेरी

First Published on: September 10, 2022 12:53 PM
Exit mobile version