खासदार बाळू धानोरकरांच्या घरी चोरीचा प्रयत्न, तिघांना अटक

खासदार बाळू धानोरकरांच्या घरी चोरीचा प्रयत्न, तिघांना अटक

खासदार बाळू धानोरकरांच्या घरी चोरीचा प्रयत्न, तिघांना अटक

खासदार बाळू धानोरकर यांच्या बंगल्यावर चोरी करण्याचा प्रयत्न झाला. घरात शिरलेल्या चोरांना काहीच मिळाल नसल्यामुळे संतापून तोडफोड केली आहे. पोलिसांनी या चोरट्यांना अटक केली आहे. धानोरकरांच्या घरी बुधवारी रात्री चोरांनी डल्ला मारला यावेळी चौकीदार आणि त्यांची पत्नी बंगल्यात उपस्थित होते.

काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या चंद्रपूरमधील घरावर चोरांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. सरकारनगरमध्ये सूर्यकिरण नावाचा धानोकरांचा बंगला आहे. याच बंगल्यामध्ये त्यांचे कार्यालय होते परंतु सध्या त्यांचे दुसऱ्या ठिकाणी कार्यालय आहे. खासदार बुधवारी वरोऱ्याला गेले होते. बंगल्यात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी करण्याचा कट रचला.

चोर मध्यरात्री खासदार धानोरकरांच्या घरात शिरले. चौकीदार आणि पत्नी झोपेत असताना चोरांनी सुरक्षा भींतीवरुन बंगल्यात उडी घेतली. दाराचे कुलूप तोडून चोर आतमध्ये शिरले. चोरांनी बंगल्यातील इतर खोल्या तपासल्या त्यांचे कुलूप तोडले. शेवटपर्यंत त्यांना काहीही सापडले नाही. यामुळे चोरांनी घरातील सामानाची तोडफोड केली. कपडे फाडून टाकले, कपाट फोडले होते. चौकीदार साफसफाई करण्यासाठी आल्यावर चोरीची माहिती खासदारांना दिली.

खासदार धानोरकरांच्या घरी चोरी झाली असल्याची तक्रार चौकीदाराने पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांची तारांबळ उडाली होती. मोठा फौजफाटा खासदारांच्या बंगल्यावर दाखल झाला. बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली. चोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ३ पथक तयार केली होती. चोरीच्या घटनेच्या १२ तासांमध्येच पोलिसांनी चोरांना बेड्या घातल्या आहेत. चौकशीदरम्यान चोरांनी आणखी दोन घरे फोडली असल्याचे समोर आले आहे. तसेच मागील काही दिवसांपासून खासदारांच्या घरात चोरी करण्याचा कट रचण्यात येत होता असेही चौकशीमध्ये समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहीत इमलकर २४, शंकर नेवारे २०, तन्वीर बेग २० अशी चोरी करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. खासदार धानोरकर कधी घरी येतात. किती वेळ घरी असतात याबाबतची माहिती चोरांनी गोळा केली होती. या सगळ्या गोष्टींची माहिती जमा केल्यानंतर चोरांनी अखेर चोरी करण्याचे ठरवलं.


हेही वाचा : यूपीमध्ये मंदिर-मशिदींवरील 4,258 भोंगे हटवले, हजारो लाऊडस्पीकरच्या आवाजावर मर्यादा

First Published on: April 28, 2022 11:06 AM
Exit mobile version