कोरोनाची तिसरी लाट; उपाययोजनांसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्व डॉक्टरांची रविवारी वैद्यकीय परिषद

कोरोनाची तिसरी लाट; उपाययोजनांसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्व डॉक्टरांची रविवारी वैद्यकीय परिषद

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार उपाययोजना करत आहे. राज्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट धडकण्याची शक्यता असल्याचे तज्ञांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या लाटेमध्ये कोरोनाचा विस्फोट होऊ नये यासाठी राज्यातील सर्व डॉक्टरांना सूचना देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित रविवार ५ सप्टेंबर रोजी माझा डॉक्टर या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेमध्ये राज्यातील सर्व डॉक्टर उपस्थित असणार आहे. या परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिसीद्वारे उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या संभाषणाने या परिषदेची सुरुवात होणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची असून कोरोना रोखण्यासाठी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील टास्क फोर्स अलर्ट मोडवर आहे. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत भयंकर स्थिती उद्भवू नये यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व डॉक्टरांना मार्गदर्शन करणार आहे. यासाठी रविवारी ५ सप्टेंबरला राज्यातील सर्व डॉक्टरांची वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. या परिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील. परिषदेमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात चर्चा करण्यात येणार असून तिसऱ्या लाटेच्या संदर्भात काही प्रश्न किंवा शंका असल्यास त्याचे निरसरन करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कशी काळजी घेतली पाहिजे याबाबत सर्व डॉक्टरांना टास्क फोर्स माहिती देणार आहे.

या वैद्यकीय आरोग्य परिषदेचे थेट प्रसारण करण्यात येणार असून आपण CMOMaharashtra या पेजवर पाहू शकता. तसेच आपल्याला काही प्रश्न पडले असतील तर www.facebook.com/onemdhealth या पेजवर पाठवू शकता. तसेच ही परिषद cmomaharashtra च्या ट्विटर, फेसबुक व युट्युबवरुनही पाहू शकता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या परिषदेला राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ.संजय ओक, मुलांसाठीच्या टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ.सुहास प्रभू उपस्थित राहणार आहेत.


हेही वाचा : अनिल देशमुखांचा जावई गौरव चतुर्वेदीची सीबीआयकडून चौकशी


 

First Published on: September 1, 2021 10:18 PM
Exit mobile version