पंकज भुजबळ यांच्या राज भेटीमागे हे आहे कारण

पंकज भुजबळ यांच्या राज भेटीमागे हे आहे कारण

राष्ट्रवादीचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई येथील शिवतीर्थावर भेट घेतली. याबाबत मंत्री भुजबळ यांनी खुलासा करताना पंकज यांच्या भेटीला दुजोरा देत विरोधी पक्षातील लोकांना विरोधक मानतो, शत्रू मानत नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातील आपल्या भाषणात भुजबळ यांच्या शपथविधीबाबत टिकास्त्र सोडले होते. भोंग्याच्या मुद्द्यावरून राज यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला. ठाण्यातील सभेतही राज यांनी भुजबळांवर टिका केली. त्यानंतर दोनच दिवसांनी थेट पंकज भुजबळ हे राज यांच्या भेटीला गेल्याने राजभेटीमागचे रहस्य नेमकं काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर स्वतः छगन भुजबळ यांनीच शुक्रवारी नाशिकमध्ये या भेटीबाबत खुलासा केला. ते म्हणाले, राज यांना नातू झाला म्हणून पेढ्यांसह पंकज यांनी सपत्नीक त्यांची भेट घेतली. यात वावगे काही नाही. विरोधी पक्षातील लोकांना विरोधक मानतो, शत्रू मानत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

न्याय व्यवस्थेबाबत जनतेेत संभ्रम नको
यावेळी भुजबळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्मातील सामाजिक विषमतेतून सर्वसामान्यांना बाहेर काढण्याचे काम केले. सर्व देशवासियांना मार्ग दाखवला. हा आनंदाचा दिवस आहे. उत्साह असला तरी अशांततेचे गालबोट लागायला नको, असे आवाहन त्यांनी केले. सत्र न्यायालय प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या यांना जामीन नाकारते आणि हे लपून बसतात. त्यानंतर उच्च न्यायालयात त्यांना दिलासा मिळतो. पण, कोर्टाने कारवाई करू नका, असे सांगितले नसल्याने पोलीस योग्य ती कारवाई करतीलच पण न्याय व्यवस्थेबाबत जनतेत शंका निर्माण व्हायला नको. बाबासाहेबांच्या कायद्याला तडा जाऊ नये यासाठी न्यायव्यवस्थेने काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

First Published on: April 14, 2022 4:45 PM
Exit mobile version