यंदाच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी चांगली तरतूद असेल; मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

यंदाच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी चांगली तरतूद असेल; मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर करण्यासाठी अवघा एक आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. 2024 मध्ये देशात सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. त्यापूर्वी यंदाचे हे पूर्ण अंतिम बजेट आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात अनेक क्षेत्रांना मोठा फायदा होणार आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला चांगले सहकार्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. (This year budget will have a good provision for Maharashtra First says Chief Minister Eknath Shinde)

दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो. या अर्थसंकल्पातून किती निधीची तरतुद केली जाणार याकडे देशातील सर्व राज्यांचे लक्ष लागलेले असते. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना दाच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला चांगले सहकार्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

याशिवाय, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काही विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच, राज्यातील प्रलंबित मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच होणार असल्याचे शिंदेंनी सांगितले. त्यामुळे आगामी निवडणुका पाहाता मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – वंचितची युती, पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादीचे नेते घेणार ठाकरेंची भेट

First Published on: January 25, 2023 8:52 AM
Exit mobile version