जे लोक अल्पमतात आहेत त्यांना अपात्र करण्याचा अधिकार नाही – एकनाथ शिंदे

जे लोक अल्पमतात आहेत त्यांना अपात्र करण्याचा अधिकार नाही – एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी एका खासगी वृत्त वाहिनीशी फोनवरू संवाद साधला यावेळी त्यांनी पुढची रनणीती सांगीतली. यावेळी आमदारांची बैठक होईल आणि पुढची रनणीती ठरवली जाईल असे एकनाथ शिंदे म्हणाले. बहूमताचा आकडा लागतो तो पूर्ण झाला आहे. त्या पेक्षा जास्त आमदार झाले आहेत. त्यांच्या बरोबर अपक्ष आमदार आमच्या सोबत आहेत. त्यामुळे कायदेशीर आणि तात्रीक बाबी पूर्ण झाल्या आहेत. असा कुठलाही निर्णय आम्ही घेतलेला नाही. बैठक होईल त्यानंतर जो निर्णय होईल तो आपल्याला कळेल असे एकनाथ शिंदे म्हणाले.

आमदाराचे निलंबन करण्याचा अधीकार नाही. जे लोक अल्पमतात आहेत त्यांना अपात्र करण्याचा अधिकार नाही. आमच्याकडे बहूमत आहे. बैठकीला गेलो नाही त्यामुळे अपात्र करणे हे देशातील पहीले उदाहरण ठरेल. जो अधिकारच नाही तो अधीकार आपल्याला राबवता येणार नाही. देशात राज्याघनटा आहे, कायदा आहे, नियम आहेत, कायदा आहे त्या प्रमाणेच आपल्याला चालावे गालेल. कोणाल वाटेल तसे ते येणार नाही, अशी टीका त्यांनी नाव न घेता पक्ष प्रमुखांवर केली.

पक्षाच्या चीन्हावर दावा नाही – 

यावेळी त्यांना पक्षाच्या चीन्हावर आपण दावा केला आहे का?, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले आम्ही असा कोणताही दावा केलेला नाही. आम्ही बाळासाहेबांचे सैनीक आहोत. आमच्याकडे बहूमत आहे. बैठकीनंतर आणखी गोष्टी स्पष्ट होतील.

शेवटी नंबर महत्वाचे –

शरद पवार यांनी त्यांना बहूमत सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्रत यावे लागेल, असा इशार दिला होता, यावर त्यांनी पवार साहेब देशाचे मोठे नेते आहेत. त्यांचा आम्ही आदर करतो. परंतु शेवटी नंबर महत्वाचे असतात. कायद्या प्रमाणे, नियमा प्रमाणे आहे तेच कारवे लागते आपल्याला मला जास्त सांगण्याची आवश्यक्ता नाही. नियमा प्रमाणे, कायद्या प्रमाणे आणि घटने प्रमाणे आमची बाजू भक्कम आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

 

First Published on: June 24, 2022 5:41 PM
Exit mobile version