जे सोडून गेले ते फुटीरतावादी लोक आहेत, आदित्य ठाकरेंचा टोला

जे सोडून गेले ते फुटीरतावादी लोक आहेत, आदित्य ठाकरेंचा टोला

आदित्य ठाकरे

शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज वरळी मतदार संघातील वरळी नाका ते लोअर परळ येथील गणपतराव कदम मार्गावरील विविध २० विकासकामांचं लोकार्पण केलं . शिवसेना लोककर्तव्यात तसूभरही मागे हटणारी नाही . यापुढेही शिवसेनेचे काम अधिक झपाट्याने सुरू राहील, आपण वचन दिलेली सर्व कामे वेळेत पूर्ण होत आहेत, याचा आनंद आहे . यापुढेही सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, यासाठी सदैव प्रयत्नशील राहू असं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी वरळीकरांना दिलंय .

यावेळी बोलताना लोकांचं प्रेम शिवसेनेसोबत कायम आहे , मूळ मुंबईकर, राजकीय-अराजकीय लोक उद्धव ठाकरे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत . कोणी कुठेही गेले तरी मूळ मुंबईकर शिवसेनेसोबत असल्याचं प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केलंय . त्याच बरोबर चर्चेकडे लक्ष देत नाही , सगळे सोबत आहेत, त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद बरोबर आहे असंही आदित्य ठाकरे म्हणाले .

आदिवासी महिला राष्ट्रपती बनत असेल तर त्यांना पाठींबा देणे आमचे कर्तव्य – आदित्य ठाकरे

राष्ट्रपती निवडणुकीत प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना यापूर्वी शिवसेनेने पाठींबा जाहीर केला होता , राष्ट्रपती पद हे कोणत्या पक्षाचे नसते देशाचे असते , आदिवासी महिला पुढे येत असेल राष्ट्रपती बनत असेल तर त्यांना पाठींबा देणे हे आमचे कर्तव्य आहे असं मत आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केलं .

स्वार्थासाठी दुसरीकडे गेले यांना बंडखोर नाही तर गद्दार म्हणतात

पळून गेलेले आमदार यांना बंडखोरी म्हणत नाही गद्दारी म्हणतात , बंडखोर म्हणजे राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जातात, उद्धव ठाकरे यांच्यामुळे यांना सर्वकाही मिळाले त्यांनी पाठीत खंजीर खुपसला, जे स्वार्थासाठी दुसरीकडे गेले यांना बंडखोर नाही तर गद्दार म्हणतात .

महापालिका निवडणूक निर्णय पक्ष प्रमुख घेतील

मुंबई महापालिका निवडणूका आल्यावर महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय घेऊ, मात्र या बद्दलचे सारे निर्णय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे घेतील असं आदित्य ठाकरे म्हणाले .

First Published on: July 12, 2022 10:16 PM
Exit mobile version