जळगावातील पाचोऱ्यात पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत

जळगावातील पाचोऱ्यात पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत

जळगावातील पाचोऱ्यात पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे काल, सोमवारी रात्री तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवतहानी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे पाच वर्षांपूर्वी ही इमारती बांधली होती. मात्र बांधकामात तांत्रिक दोष राहिल्यामुळे पाचोऱ्यातील ही इमारती कोसळली. यापूर्वी या इमारतीच्या भिंतींना तडे गेले होते. त्यामुळे इमारतीमधील अनेक भाडेकरुंनी घर सोडली होती, म्हणून या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवतहानी झाली नाही.

पाचोरा शहरातील बाहेरपूरा भागात ही इमारत होती. मुंबईचा रहिवासी असलेला साजेदावी शेख खल्ली या व्यक्तीने गुंतवणूक म्हणून ही इमारत पाच वर्षांपूर्वी बांधली होती.

मुसळधार पावसामुळे इमारतीच्या भिंतींना तडे गेले होते. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच अनेक भाडेघरू इमारतीमधील घरं सोडून गेली होती. काल, सोमवारी रात्री तुरळक प्रमाणात पाऊस पडला आणि त्यानंतर पत्त्याच्या इमारतीप्रमाणे ही इमारत कोसळली. सुदैवाने दुर्घटनेपूर्वीच लोकं घर सोडून गेल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


हेही वाचा – मुंबई-गोवा महामार्गाचे खड्डे; हायकोर्टाची राज्य सरकारला तंबी


 

First Published on: September 21, 2021 8:18 AM
Exit mobile version