कल्याणची तीन वर्षांची मुलगी करोनाग्रस्त; कस्तुरबात उपचार घेणाऱ्यांची संख्या १४

कल्याणची तीन वर्षांची मुलगी करोनाग्रस्त; कस्तुरबात उपचार घेणाऱ्यांची संख्या १४

प्रातिनिधिक छायाचित्र

भारतासह मुंबईत करोनाचे संक्रमण पसरत असून दिवसेंदिवस संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत मुंबईत १४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यात एका तीन वर्षांच्या मुलीचा ही समावेश आहे. हया सर्व रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वी कल्याण मधील निदान झालेल्या रुग्णांची पत्नी ३३ वर्षीय महिला आणि ३ वर्षीय मुलगी या दोघांनाही करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट केलं आहे. मुलीच्या वडिलांपासून करोनाचा संसर्ग झाल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

एस विभागातील ४४ वर्षीय महिलेचे १३ मार्च या दिवशी करोना पॉझिटिव्ह निदान झाले. ही महिला लिसवान, पोर्तुगल या देशातून प्रवास करुन १३ तारखेला मुंबईत दाखल झाली. ही महिला दोन सहकाऱ्यांसोबत कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यांच्या बिल्डिंगमध्ये केलेल्या सर्वेक्षणात एकही रुग्ण आढळलेला नाही.

मुंबईतील संशयित करोना रुग्णांची संख्या

परदेशी प्रवाशांची विमानतळावरील तपासणी – २ लाख ४६ हजार ८४३
सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये दाखल प्रवासी – १०
कस्तुरबा हॉस्पिटलमधील संख्या – १४
दाखल झालेले एकूण संशयित रुग्ण – ४९८
निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या रुग्णांची संख्या – ४५२
पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या – १४ (६ मुंबई, ८ मुंबई बाहेरील)
हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची संख्या – ६५
आज तपासलेल्या नमुन्यांची संख्या – २०

सेव्हन हिलमध्येही उपचार

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, सेव्हन हिल हॉस्पिटलमध्येही विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. एकूण २४ डॉक्टरांची नियुक्ती ३ शिफ्टमध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार आता इथे ही उपचार केले जातील.

First Published on: March 16, 2020 9:49 PM
Exit mobile version