TMC Drain : कचऱ्याने भरलेल्या नाल्याची पोलखोल

TMC Drain : कचऱ्याने भरलेल्या नाल्याची पोलखोल

ठाणे : कोलशेत येथील लोढा स्टर्लिंग अमरा या ठिकाणी असलेला नाल्याची साफसफाई अजूनही झाली नाही. याबाबत येथील नागरिकांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रार केली त्यांनी तातडीने या नाल्याची पहाणी केली. याप्रसंगी हा नाला आहे की रस्ता ? असा प्रश्न आमदारांनी ठामपा प्रशासनाला करून नाल्याची पोलखोल केली.

कचऱ्याने भरलेल्या नाला पाहून आ. केळकर यांनी ठाणे महानगरपालिकेवर संताप व्यक्त केला. या नाल्याच्या दुर्गंधीचा त्रास येथील गृहसंकुलातील लोकांना होत असून आजार पसरले आहेत. या नाल्यात अनेक प्रकारचे प्लास्टिक असून लवकरात लवकर महापालिकेने हा नाला साफ करावा अशा सुचना देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

हेही वाचा –Thane Crime: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ब्लॅक मॅजिक, मुलींच्या शोषणप्रकरणी मांत्रिकाची टोळी अटकेत

ठाण्यात दरवर्षी पावसाळ्या पूर्वी नाले सफाईचा निविदा काढून सुरुवात करण्यात येते. पण यावेळी अद्यापही नालेसफाईला सुरुवातच झालेली नसल्याने नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामध्ये कडक उन्हाळा असल्याने कचऱ्याची दुर्गंधी नाल्याच्या जवळ राहत असलेल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावी लागत आहे.

पावसाचे पाणी नाल्याद्वारे वाहत खाडीला जाऊन मिळते. नाले साफ असले कि पावसाचे पाणी देखील थेट कुठेही न थांबता, थेट खाडीमध्ये जाते. पण यंदा लोकसभा निवडणुकीत सर्व कर्मचारी गुंतलेले असल्यामुळे नाले सफाईकडे दुर्लक्ष होते का ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

शहापूर येथे अवकाळी पाऊस पडला तसाच अवकाळी पाऊस ठाणे परिसरात जोरदार पडला तर नाल्याशेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरामध्ये घाण कचरा जाईल, अशी भीती देखील नागरिक व्यक्त करत आहेत. ठाणे महानगरपालिकेला वेळीच नालेसफाईची जाग यावी, याकरिता आमदार संजय केळकर यांनी कचऱ्याने तुडुंब भरलेल्या नाल्याची पाहणी करून पोलखोल केली. पण यामुळे आता तरी ठाणे महानगर पालिकेचे घन कचरा विभागाचे डोळे उघडतील का ? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

हेही वाचा –Thane : फी भरली नाही म्हणून पेपर लिहितानाच विद्यार्थ्यांना काढलं वर्गाबाहेर; ठाण्यातील धक्कादायक घटना

———————————————————————————————-

Edited by- Amol Kadam

First Published on: April 20, 2024 4:02 PM
Exit mobile version