घरक्राइमThane Crime: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ब्लॅक मॅजिक, मुलींच्या शोषणप्रकरणी मांत्रिकाची टोळी अटकेत

Thane Crime: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ब्लॅक मॅजिक, मुलींच्या शोषणप्रकरणी मांत्रिकाची टोळी अटकेत

Subscribe

ठाणे : देश 21 व्या शतकात पोहचलेला असतानाही आज अनेकजण अंधश्रद्धेला बळी पडताना दिसता आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींचे शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकने मांत्रिकासह सात जणांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे यात एका महिलेचाही समावेश आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून गोरगरीब मुलींना या टोळीने स्वतःच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. (Thane Crime Black Magic in Chief Ministers Thane Mantrikas gang arrested in case of exploitation of girls)

हेही वाचा – Rahul Gandhi : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची सभा; भारत जोडो न्याय यात्रा ठाण्यात

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या राबोडी पोलीस ठाण्यात एका 15 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्ह्याचा समांतर तपास ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एककडून सुरू होता. 17 फेब्रुवारीला राबोडीतील असलम खान (54), सलीम शेख (45) या दोघांना या प्रकरणात अटक केली. त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजेच 27 फेब्रुवारीला मुंबईच्या अँटॉप हिल येथील झोपडपट्टीतून मांत्रिक साहेबलाल वजीर शेख उर्फ युसुफ बाबा (61) याला अटक करण्यात आली. या तिघांची चौकशी केल्यानंतर राबोडीतील तौसिफ शेख (30), शबाना शेख (45), शब्बीर शेख (53) तसेच लालबाग येथून हितेंद्र शेट्टे या चौघांना अटक करण्यात आली.

हेही वाचा – Jarange VS Fadnavis : फडणवीसांनी मला आत टाकून दाखवावेच; जरांगेंचे पुन्हा आव्हान

- Advertisement -

पोलिसांनी सांगितले की, ही टोळी गोरगरीब पीडित मुलींना हेरून पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत होती. पीडीत मुलींना विश्वास बसावा यासाठी ते मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग केलेला महिलेचा आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ दाखवत होते. व्हिडीओमध्ये महिलेच्या शेजारी पैशांचा ढीग पडलेला दिसत होता. तुम्हालाही अशा पद्धतीने कोट्यावधी रुपये हवे असतील तर, विधी करण्यास सांगून मांत्रिक व त्याचे साथीदार पीडित मुलीवर अत्याचार करायचे. तरुणीच्या अपहरणाचा शोध घेत असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलीस निरीक्षक विकास सूर्यवंशी यांच्यासह त्यांच्या पथकाने याप्रकरणी कसून तपास केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -