Omicron Variant: राज्यात आज ओमिक्रॉनच्या ८ नव्या रुग्णांची भर: एकूण आकडा ४०वर

Omicron Variant: राज्यात आज ओमिक्रॉनच्या ८ नव्या रुग्णांची भर: एकूण आकडा ४०वर

Omicron Variant: देशात ओमिक्रॉनबाधितांची संख्या २००वर; ७७ रुग्ण झाले बरे

राज्यात ओमिक्रॉनबाधित रुग्णांचे आकडे जरी वाढताना दिसत असले तरी त्याचे वेगाने रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. आज राज्यात ८ नव्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या ४०वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे यापैकी २५ रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज आढळलेल्या ८ रुग्णांपैकी ७ रुग्ण लक्षणेविरहित आणि १ रुग्णात सौम्य लक्षणे आढळली आहेत. तसेच हे ८ रुग्ण पुरुष आहेत.

देशात सर्वाधिक ओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. काल, गुरुवारी महाराष्ट्रात एकाही ओमिक्रॉनबाधित रुग्णाची नोंद झाली नव्हती. मात्र आज ८ नव्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ६ रुग्ण पुणे, १ रुग्ण मुंबई आणि १ रुग्ण कल्याण-डोबिंवली येथे आढळले आहेत. या ८ ही रुग्णांमध्ये ओमिक्रॉनबाबत कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत. या सर्व रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आज आढळलेल्या ८ रुग्णांपैकी पुणे येथील ४ रुग्णांचा दुबई प्रवास आणि २ रुग्ण निकटसहवासित आहेत. मुंबई येथील १ रुग्णाचा अमेरिका प्रवास आणि कल्याण डोंबिवली येथील १ रुग्णाचा नाजेरिया प्रवास आहे. या ८ रुग्णांपैकी २ रुग्ण रुग्णालयात तर ६ जण घरी विलगीकरणात आहेत. तसेच या रुग्णांच्या निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.

ओमिक्रॉनचे कुठे, किती रुग्ण आढळले? 

मुंबई – १४
पिंपरी चिंचवड – १०
पुणे ग्रामीण – ६
पुणे मनपा – २
कल्याण डोंबिवली – २
उस्मानाबाद – २
बुलढाणा – १
नागपूर – १
लातूर – १
वसई विरार – १


हेही वाचा – Omicron Variant: ओमिक्रॉनविरोधात Sputnik-V प्रभावी; रशियाचा मोठा दावा


 

First Published on: December 17, 2021 7:59 PM
Exit mobile version