Omicron Variant: ओमिक्रॉनविरोधात Sputnik-V प्रभावी; रशियाचा मोठा दावा

Russia says Sputnik-V vaccine effective against Omicron variant of coronavirus
Omicron Variant: ओमिक्रॉनविरोधात Sputnik-V प्रभावी; रशियाचा मोठा दावा

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने जगाची चिंता वाढवली आहे. आतापर्यंत ९१ देशांमध्ये ओमिक्रॉनने आपले पाय पसरले आहेत. अशातच सर्व देश लसीकरणावर अधिक भर देत आहेत. तसेच काही देशांनी लसीचे अतिरिक्त डोस आणि बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे. या भीतीचे वातावरण रशियाने दिलासादायक दावा केला आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनविरोधात (Omicron variant) रशियन बनावटीची कोरोना प्रतिबंधात्मक लस स्पुटनिक-व्ही (Sputnik-V vaccine) प्रभावी असल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियन बनावटची स्पुटनिक-व्ही लस भारतात देखील दिली जात आहे. (Sputnik-V vaccine effective against Omicron variant of coronavirus)

आज, शुक्रवारी रशियन डायरेक्ट इंव्हेस्टमेंट फंडने सांगितले की, रशियाची स्पुटनिक-व्ही लस ओमिक्रॉन व्हेरिएंटविरोधात मजबूत अँटीबॉडीज निर्माण करते. तसेच पुढे ते स्पुटनिक लाईट बूस्टर आणखी मजबूत बनवते. रशियाच्या गॅमेलिया नॅशनल रिसर्च सेंटरमध्ये झालेले अभ्यासातून हे समोर आले आहे. तसेच स्पुटनिक-व्ही लस गंभीर आजार आणि रुग्णाला रुग्णालयात भरती होण्यासाठी रोखण्यात मदत देखील करते.

माहितीनुसार, स्पुटनिक-व्ही लस इतर लसींपेक्षा तीन ते सात पटीने चांगली प्रभावी आहे. तसेच स्पुटनिक लाईट ही ८० टक्के प्रभावी आहे. स्पुटनिक-व्ही ही लस जगातील पहिला कोरोना प्रतिबंधात्मक लस आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत स्पुटनिक-व्ही कोरोना विरोधात ९१.६ टक्के लस प्रभावी दर्शवली होती. भारतात हैदराबादमध्ये स्थित असलेल्या कंपनी डॉ.रेड्डीज लॅबॉरटरी कंपनी ‘स्पुटनिक-व्ही’चे उत्पादन करत आहे. ‘स्पुटनिक-व्ही’ ही एक व्हुमन अ‍ॅडेनोव्हायरस लस (Human adenovirus vaccine) आहे.


हेही वाचा – Omicron Variant: देशातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या १०० पार; ११ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव