‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या कोणीही जाण्यास उत्सुक नाही’

‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या कोणीही जाण्यास उत्सुक नाही’

महाराष्ट्रातील राजकारणाला सध्या एक वेगळचं वळणं आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षात पक्षांतर करत आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या संपर्कात आघाडीतील ५० पेक्षा अधिक आमदार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तसेच महाजन यांनी असे देखील म्हटले की, ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या कोणीही जाण्यास उत्सुक नाही आहे. अनेकांची पक्षावरील निष्ठा संपत चालली आहे. अनेक आघाडीचे दिग्गज नेते हे आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश करत आहेत. लवकरच आपल्या संपर्कात असलेले अनेक आमदार भाजपात प्रवेश करतील. तसेच विधानसभेला युती तोडणार नसल्याचे’ महाजन यांनी सांगितले.

शिवेंद्रराजे भोसले, कालिदास कोळंबकर आणि वैभव पिचड या आमदारांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला असून यावेळी त्यांच्यासोबत गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. पक्षांतराचे कारण अंतर्गत गटबाजी असल्यामुळे याच्या फटका सर्वांना बसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि कार्यकर्ते सध्या हे पक्षाच्या कार्यपद्धतीला कंटाळले आहेत, असे गिरीश महाजन म्हणाले.


हेही वाचा – आता काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येईल असं वाटत नाही – शिवेंद्रराजे भोसले


जे आमदार भाजपात येत आहेत, त्यांना आपल्या विभागाची काळजी आहे. तसेच अनेकजण भाजपात येण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे आम्ही कोणत्याही आमदाराला कोणतेही आश्वासन दिले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बुधवारी भाजपात संदिप नाईक, शिवेंद्रसिंहराजे भोसले, कालिदास कोळंबकर आणि वैभव पिचड हे चार आमदार प्रवेश करण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे.

First Published on: July 30, 2019 3:10 PM
Exit mobile version