घरमहाराष्ट्रआता काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येईल असं वाटत नाही - शिवेंद्रराजे भोसले

आता काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येईल असं वाटत नाही – शिवेंद्रराजे भोसले

Subscribe

खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सांगून देखील राष्ट्रवादीचे साताऱ्यातले आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. आज विधानभवनात त्यांनी आपला राजीनामा सादर केला.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षांतर करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं असून ज्यांच्या नावावर बरीच चर्चा सुरू होती, त्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी अखेर मंगळवारी आपल्या आमदारकीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे शरद पवारांनी ‘उदयनराजेंचं आम्ही पाहातो, तुम्ही थांबा’, असं सांगून देखील शिवेंद्रराजे थांबलेले नाहीत. दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर शिवेंद्रराजे भोसलेंनी ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आता येईल असं तरी सध्याची राजकीय परिस्थिती पाहून वाटत नाही. त्यामुळेच भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला’, अशी प्रतिक्रिया दिली.

Shivendraraje Bhosle Resigned
शिवेंद्रराजे भोसलेंनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला.

हेही वाचा – उदयनराजे खालच्या पातळीवर उतरतील, असे वाटले नव्हते – शिवेंद्रराजे

‘पवारांबद्दल अजूनही आदरच’

दरम्यान, शरद पवारांनी वारंवार सांगून देखील शिवेंद्रराजे भोसलेंनी राजीनामा दिल्यामुळे पवारांच्या शब्दाला देखील मान नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ‘शरद पवारांचा अजूनही आदर आहेच. शिवाय अजितदादांचंही मला मार्गदर्शन मिळालं आहे. आमचे थोरले बंधू उदयनराजेंचंही मार्गदर्शन मिळत राहीलच. पण या सगळ्यापेक्षा मला माझ्या मतदारसंघातली कामं होणं महत्त्वाचं आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येईल असं वाटत नाही. त्यामुळे मतदारसंघातली कामं होण्यासाठी भाजपमध्येच जाणं योग्य ठरेल’, असं ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -