मध्य रेल्वेवर उद्या ‘नाईट मेगाब्लॉक’

मध्य रेल्वेवर उद्या ‘नाईट मेगाब्लॉक’

कल्याण ते मुरबाड मार्ग सुरु होण्याची प्रतीक्षा

मध्य रेल्वेवर २९ ऑगस्टच्या मध्यरात्री विशेष मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. कल्याण-डोंबिवली येथे जुन्या वीज वाहिन्यांचे जाळे काढण्यासाठी रात्री २ ते ३ दरम्यान मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेतला जाईल. या मेगाब्लॉकमुळे मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात देखील बदल केला जाणार आहे.

मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्यांच्या वेळांमध्ये बदल

चेन्नई-सीएसएमटी पंजाब मेल, भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस या गाड्या कर्जत-पनवेल मार्गावरुन वळवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे या गाड्यांतून प्रवास करणाऱ्या कल्याण स्थानकातील प्रवाशांना दिवा येथे थांब देण्यात येणार असून या गाड्या सुमारे १५ मिनिटे उशीराने धावणार आहेत.

या ठिकाणी देण्यात येणार थांबा

मुझ्झरपूर-एलटीटी आणि अमृतसर-सीएसएमटी या एक्स्प्रेसला कल्याण येथे थांबा देण्यात येणार असून गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेसला टिटवाळा येथे थांबा दिला जाणार आहे. तर पंढरपूर-सीएसएमटी गाडीला दादर येथे अंतिम थांबा देण्यात येईल.

First Published on: August 28, 2018 10:37 PM
Exit mobile version