दाऊदच्या नातेवाईकाला वक्फ बोर्डावर घेतलं; फडणवीसांकडून पुन्हा ऑडिओ क्लिपचा बॉम्ब

दाऊदच्या नातेवाईकाला वक्फ बोर्डावर घेतलं; फडणवीसांकडून पुन्हा ऑडिओ क्लिपचा बॉम्ब

मुंबईः दाऊदशी नातं असलेल्या व्यक्तीला वक्फ बोर्डावर घेतल्याचं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा विधानसभेत ऑडिओ बॉम्ब टाकलाय. डॉ. मुद्दस्सिर लांबे आणि अर्शद खान यांच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिपच सगळ्यांसमोर ठेवलीय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दाऊदचे नाते संबंध असलेल्या व्यक्तीला वक्फ बोर्डावर घेतल्याचं सांगत खळबळ उडवून दिलीय. तसेच त्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिपही सादर केलीय.

ऑडिओ क्लिपमधील दोघांचं संभाषण जसंच्या तसं

संवाद: सलामवालेकूम

डॉ. लांबे: मला माहीत आहे की माझी अडचण काय आहे. माझा सासरा पूर्वी दाऊदचा उजवा हात होता आणि माझे नाते हसीना आपाने जुळवले होते. माझ्याकडून सोहेल भाई आणि हसीना आपा होती. हसीना आपा म्हणजे दाऊदची बहीण आहे. हसीना आपा आणि सोबत इक्बाल कासकरची पत्नी आहे. ती म्हणजे दाऊदची मेहुणी आहे. काहीही झाले तरी प्रकरण तिथपर्यंत पोहोचते.

अर्शद खान : तुम्ही अन्वरचे नाव ऐकले असेल. तो माझा मामा आहे. तोही त्यांच्यासोबत राहत होता. म्हणजे सुरुवातीला राहत होता. त्यांचे नुकतेच निधन झाले.

डॉ. लांबे : माझे सासरे संपूर्ण कोकण पट्टा सांभाळत होते, त्यांच्याकडे ब्लॅक बेल्ट होता आणि ते संपूर्ण कोकण पट्टा सांभाळायचे.

अर्शद खान : ठीक आहे. माझे एक काका बॉम्बेला होते आणि ते सर्व सांभाळायचे. जेव्हा मी मदनपुरात होतो. माझा जन्म भेंडी बाजारात झाला आहे.

डॉ. लांबे : माझ्या घरात काही समस्या असेल तर ती तिथे पोहोचते. साधी चर्चासुद्धा सोहेल भाईपर्यंत पोहोचते. चार दिवसांपासून माझ्या घरात हा वाद सुरू आहे. जीव द्यावं, असं वाटतं.

अर्शद खान: म्हणूनच मी बरोबर विचारलं तुझी स्टोरी काय आहे, मग मी काहीच बोललो नाही, मला स्वतःचं टेन्शन आहे.

डॉ. लांबे : अर्शद, मी म्हणतो की तू आता वक्फचे काम सांभाळ. तुमच्याकडे आता सत्ता आहे. आता तुम्हाला हवे तितके पैसे कमावू शकता. संपूर्ण वक्फचे काम सुरू करा. कमाई सेट करा. अर्धा तुमचा आणि अर्धा माझा हिस्सा असेल

अर्शद खान: आता मी बसेन आणि या सर्व गोष्टींमध्ये मी वैयक्तिकरित्या तुमच्याबरोबर बसेन. मी माझ्या एका मित्राला घेऊन येईन आणि मी काम करून घेईन.

डॉ. लांबे : आमच्या माहीममध्ये मला काही झालं की सगळे लोक एकत्र यायचे.

अर्शद खान : अर्शदच्या नावावर इमारत घ्या. अर्शद माझा विश्वासू माणूस आहे. पलटी मारणार नाही.

डॉ. लांबे : चौकशी तुमच्यावर बसू शकते, पण ती माझ्यावर बसू शकत नाही.

—————————————————————————————————-हेही वाचाः फडणवीसांना पाठवलेली नोटीस आरोपी म्हणून किंवा अडचणीत आणण्यासाठी नव्हती, गृहमंत्र्यांची विधानसभेत माहिती

First Published on: March 14, 2022 5:52 PM
Exit mobile version