विदेशी षडयंत्रात शिवसेनेचे हस्तक; राम कदमांचा आरोप

विदेशी षडयंत्रात शिवसेनेचे हस्तक; राम कदमांचा आरोप

राम मंदिराच्या निधीत एका रुपयाचीही हेराफेरी नाही, शिवसेनेने माफी मागावी - राम कदम

केंद्राने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांनी एक ‘टूलकिट’ शेअर केलं. या प्रकरणी तिच्यावर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणात दिशा रवी, निकिता जेकब आणि बीडमधील पर्यावरणवादी कार्यकर्ता शंतनू मुळूक यांचं देखील नाव समोर आलं आहे. दरम्यान, शंतनू मुळूक वरुन भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे. विदेशी षडयंत्रात शिवसेनेचे हस्तक असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे.

राम कदम यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेचे काही लोक विदेशी षडयंत्रात सामिल आहेत. शंतनू मुळूक हा बीडमधील शिवसेना जिल्हा प्रमुखाचा चूलतभाऊ आहे. शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला आहे. सत्तेसाठी शिवसेना खालच्या स्तरावर गेली आहे. आता स्वर्गीय बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. हिंदुत्व आणि देशहिताच्या गोष्टी करणारी शिवसेना खालच्या स्तराला गेली आहे, अशी टीका राम कदम यांनी त्यांच्या व्हिडिओतून केली आहे.

दिशा, निकिता आणि शंतनूने तयार केलं ‘टूलकिट’ – दिल्ली पोलीस

दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू या तिघांनी ‘टूलकिट’ तयार केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे. हे तिघे खलिस्तानींच्या संपर्कात होते. या प्रकरणी दिशा रवी हिला पोलिसांनी अटक केली आहे. तर निकिता जेकब आणि शंतनू मुळूक या दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.


हेही वाचा – Tool Kit: टूलकिट प्रकरणी शंतनू मुळूकला अटकेपासून दिलासा; १० दिवसांचा जामीन मंजूर


 

First Published on: February 16, 2021 6:10 PM
Exit mobile version