मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, चाकरमानी अडकले रस्त्यातच

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, चाकरमानी अडकले रस्त्यातच

गणेशोत्सवासाठी कोकणात चाकरमानी निघाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांनी सार्वजनिक वाहनांचा जास्त वापर न करता खासगी वाहनांचा वापर जास्त करताना दिसत आहे. यामुळे कालपासून मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. आज देखील चाकरमानी वाहतूक कोंडीत अडकले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीच्या चिपळूण तर सिंधुदुर्गातील खारेपाटण तपासणी नाक्यावर गर्दी झाली आहे. शिवाय कशेडी घाटात वाहनांच्या लांबच लांब रागा लागल्या आहेत. वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या असून चाकरमान्यांना रस्तामधेच अडकून पडावे लागले आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून कोकणात ७ ऑगस्टच्या आत पोहोचण्याच्या हिशोबाने कोकणाकडे चाकरमानी निघाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण टोलनाक्यावर वाहनांना थांबवले जात असून प्रत्येकाटी अँटिजेन टेस्ट केली जात आहे. यामध्ये ज्यांच्या टेस्ट निगेटिव्ह येत आहेत. त्यांनी पुढे प्रवास करण्यासाठी मुभा दिली जात असून त्यांना त्यानंतर जवळच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले जात आहे.

टोलनाक्यावर प्रत्येकाची अँटीजन टेस्ट करण्यात येत असल्याने तास-दीड तास यामध्ये जात आहे आणि वाहनांचा खोळंबा झाला आहे. यामुळेच मुंबई-गोवा महामार्गावर चिपळून आणि खारेपाटण टोलनाक्यावर कालपासून वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या वाहनांच्या रांगा दोन ते तीन किलोमीटर एवढ्या आहेत. यादरम्यान अधूनमधून पाऊस पडत असल्याने चाकरमान्यांची हाल होत आहेत. शिवाय कोरोनामुळे कोणतेही हॉटेल किंवा ढाबा उघडा नसल्याने चाकरमान्यांचा चहापाणी मिळणे कठीण झाले आहेत.

First Published on: August 2, 2020 10:26 AM
Exit mobile version