ठाणे-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

ठाणे-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

ठाणे-नाशिक आणि घोडबंदर ते नाशिक महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. या महामार्गावर 10 ते 15 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचा चार ते पाच तास खोळंबा झाला. पाऊस आणि चिखल यामुळे प्रवाशांना गाडीत बसून रहावे लागत असल्याने त्यांचा संतापाचा पारा चढला होता.

ठाणे ते नाशिक आणि घोडबंदर ते नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावर 10 ते 15 किलोमीटरपर्यंत लांबच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना गेल्या 3 तासांपासून वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले होते. सतत पडणार्‍या पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने त्यातून गाडी चालवणे प्रवाशांना कठिण होऊन बसले आहे. त्यामुळेच या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. एमएमआरडीए प्रशासनाने हा रस्ता बांधला आहे. या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्याचा वाहनधारकांना मोठा फटका बसला आहे.

खड्डे बुजवले तरीही परिस्थिती जैसे थे
दरम्यान, सकाळपासून ठाणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानंतरही वाहतूक कोंडी हटवण्यासाठी वाहतूक विभागाचा एकही अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी कशी सुटणार? असा सवाल केला जात आहे. एमएमआरडीने या महामार्गाचे काँक्रिटीकरण करावे, चांगले रस्ते बनवावेत, पाऊस थांबल्याबरोबर एमएमआरडीएने हे काम हाती घ्यावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत. एमएमआरडीएने दोन तीनवेळा या रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे रस्त्याचे काँक्रिटीकरण हाच त्यावर एकमेव पर्याय आहे, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे.

First Published on: September 22, 2021 11:45 PM
Exit mobile version