धक्कादायक! पोलिसांचा बनावट पास तयार केला आणि…

धक्कादायक! पोलिसांचा बनावट पास तयार केला आणि…

देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे याकाळात अत्यावश्यक सेवा आणि अतिमहत्त्वाच्या सेवा सोडून बाकी सर्वच गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचा परवानगी देण्यात आली असून त्यांना पोलिसांकडून पास देखील देण्यात येत आहे. मात्र, अशात पोलिसांचा बनावट पास तयार करुन एकाने पिंपरी – चिंचवड ते कोल्हापूर दरम्यान प्रवास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; पिंपरी-चिंचवड येथील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कापसे वास्तव्यास आहे. मात्र, संचारबंदी असतानाही त्यांने पिंपळे गुरव ते कोल्हापूर जिल्ह्यातील नंदनवड असा प्रवास केला. यासाठी त्यांनी पोलिसांच्या बनावट पासाचा उपयोग केला होता. याबाबत गडहिंग्जल वैद्यकीय अधिकारी यांना माहिती मिळाली. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींने पुणे, पिंपरी – चिंचवड तसेच कोल्हापूर असा  रेडझोनमध्ये प्रवास केल्याने आरोपीला होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.

दरम्यान, गडहिंग्लज पोलिसांनी सांगवी पोलिसांशी संपर्क साधून आरोपी याने प्रवासासाठी वापरलेल्या पासाबाबत चौकशी केली. त्यानंतर पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा हा बनावट पास असल्याचे निषपन्न झाले. त्यामुळे आरोपीच्या विरोधात गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – मध्यप्रदेश : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, डोळ्यांना गंभीर इजा


 

First Published on: April 23, 2020 11:17 PM
Exit mobile version