TRP Scam: BARCचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना हायकोर्टाचा दिलासा

TRP Scam: BARCचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना हायकोर्टाचा दिलासा

TRP Scam: BARCचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना हायकोर्टाचा दिलासा

टीआरपी (TRP Scam) घोटाळ्यामधील आरोपी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टाने सुनावणी झाली. याप्रकरणी आता हायकोर्टाने पार्थो दासगुप्ता यांना दिलासा दिला असून त्यांचा जामीन मंजूर केला आहे. २४ डिसेंबरला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने टीआरपी घोटाळाप्रकरणी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना अटक करण्यात आली होती. पण आता याप्रकरणी सुनावणी देणारे न्यायमूर्ती पी.डी.नाईक यांनी दासगुप्ता यांचा दोन लाखांच्या बाँडवर जामीन मंजूर केला आहे. मात्र दासगुप्ता यांना काही अटी घालण्यात आल्या आहेत. नियमित सीआययुमध्ये कार्यालयात हजेरी लावावी, पासपोर्ट कोर्टाला जमा करावा, साक्षीदारावर दबाव आणू नये, अशा अटी दासगुप्तावर घालण्यात आल्या आहेत. ते सध्या तळोजा तुरुंगात बंद आहेत.

हा घोटाळा जून २०१३ आणि नोव्हेंबर २०१९ यादरम्यान असून त्यावेळेस पार्थो दासगुप्ता बीएआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यानंतर चॅनेलच्या टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याकडून दासगुप्ता यांनी पुन्हा लाच घेतल्याची माहिती मिळाली.

गेल्या महिन्यात दासगुप्ता यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या लिखित नोटमध्ये कूबल केले होते की, दोन हॉलिडेसाठी गोस्वामीने १२ हजार डॉलर्सची लाच दिली होती. माहितीनुसार, गोस्वामी याने तीन वर्षांसाठी रिपब्लिक टीव्ही (इंग्रजी) आणि रिपब्लिक भारत (हिंदी) यांच्या बाजूने टीआरपीमध्ये फेरफारकरण्यासाठी ४० लाख रुपये दिले होते.

मुंबई पोलिसांकडून ११ जानेवारी रोजी ३ हजार ६०० पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या आरोपपत्रात बार्क फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टचा देखील समावेश केला आहे. तसेच अर्णब गोस्वामीच्या Whatsapp चॅट प्रकरणात पार्थो दासगुप्ता यांचाही समावेश आहे. या आरोपपत्रात बार्कच्या माडी कर्मचाऱ्यांसह केबल ऑपरेटर आणि ५९ जणांच्या विधानांचा समावेश आहे.


हेही वाचा – राज्यपालांनी १२ आमदार ठेवलेत मांडी खाली दाबून – संजय राऊत


 

First Published on: March 2, 2021 11:46 AM
Exit mobile version